Today : 15:08:2020


चामोर्शी तालुक्यातील को.प. साठवणूक बंधारे मंजूर बांधकाम रद्द करा : मनिषा दोनाडकर (जि.प.सदस्य यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी)

आरमोरी, दिलीप घोडाम  :- शेतकऱ्याच्या शेतीतील उत्पादन वाढ व्हावी यातून शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून शासनाने जि प च्या मार्फतीने गरजू शेतकऱ्यांना म्हणजेच आदिवासी गैर आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतलगत नाल्यावर को.प साठवणूक बंधारे बांधकाम आरमोरी तालुक्यातील आरसोडा पळासगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील पळसगाव सालभारा लोहारा गावाला उपाययोजना २७०२-४७९२ अंतर्गत मंजूर झाले होते काही दिवसात कामाला सुरुवात होणार होती परंतु  जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आरमोरी तालुक्यातील मंजूर असलेली कामे रद्द करून संपूर्ण कामे चामोर्शी तालुक्यात वळनी करून आदिवासी गैर आदिवासी उपयोजना अंतर्गत आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झाला असल्याने संपूर्ण चामोर्शी तालुक्यातील साठवणूक बंधाऱ्यांची चौकशी करून तात्काळ रद्द करण्यात यावे अशी  मागणी जिल्हा परिषद सदस्या मनीषा डोनाडलकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनातून मागणी केली आहे.
     आरमोरी तालुक्यातील पळसगाव अरसोडा जिल्हा परिषद क्षेत्रात जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता लघु सिंचन विभाग गडचिरोली अंतर्गत २७०२-४९७२ को.प.साठवणूक बंधारे पळसगाव क्रमांक ६ सालमारा लोहारा क्रमांक ४ या कामांना अंदाज तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती सदर कामाचे अंदाज पत्रक या कार्यालयातर्फे संबंधित उपविभाग शाखा अभियंता प्रत्यक्ष मोका तपासणी व सर्वेक्षण करून अंदाजपत्र विभागीय कार्यालयास सादर करण्यात आले होते हे काम निकषात नसत असतांना जिल्हा परिषद अध्यक्षांनी मनमानी करून सर्व आरमोरी तालुक्यातील कामे रद्द करून एकट्या चामोर्शी तालुक्यातील आपले क्षेत्रात १४ कामे मंजूर करून आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केले आहे. चामोर्शी तालुक्यातील सेवा कामाची चौकशी करून तात्काळ रद्द करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या मनीषा डोनाडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदना मार्फत केली आहे व तसेच कामे रद्द न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
     तसेच निवेदन सादर करतांना जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम,जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शाह,उपसरपंच प्रतीक सहारे तसेच आदी या ठिकाणी उपस्थित होते 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्