Today : 09:08:2020


कोटगुल येथे आधारभूत धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा : माजी आमदार आनंदराव गेडाम

आरमोरी, दिलीप घोडाम :-  कोटगुल परिसरात २८ गावांचा समावेश असून मोठ्या प्रमाणात धान्य पिक उत्पादन करणारे शेतकरी बंधू असूनही जवळपास कुठेही धान्य खरेदी केंद्र नाही. शेतकऱ्यांना कोरची किंवा कुरखेडा ह्या लांबच्या तालुक्यांच्या ठिकाणी आपले धान्य विक्रीसाठी नेऊन विक्री करा लागते त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन ते तीन दिवस जातात. करिता कोटगुल येथे आधारभूत धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केली आहे.
     कोरची तालुक्यातील कोटगुल हे गाव मध्यवर्गी ठिकाण असून बाजारपेठ आहे परंतु अजूनपर्यंत कोटगुल येथे आधारभूत धान्य केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोटगुल येथील काही शेतकरी बंधू आपली समस्या घेऊन माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्याकडे निवेदनामार्फत मांडली. त्यामुळे त्यांनी आदिवासी विकास मंडळाचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. चर्चेच्या अंती व्यवस्थापक कोलकवार यांनी लवकरच कोटगुल येथे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करायचे आश्वासन दिले. त्यामुळे कोटगुल परीसरातील शेयकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
     तसेच यावेळी परमेश्वर लोहबरे, रामदास दलामी, दासू दलामी, नैताम, मिलिंद खोब्रागडे व अन्य शेतकरी बंधू उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-24


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur