Today : 06:12:2019


चंद्रपूर जिल्ह्यात कापूस उद्योग उभारण्यास सरकारने मदत करावी - अमोल मुथा

प्रतिनिधी, वरोरा : - चंद्रपूर जिल्‍ह्यातील कापुस दर्जेदार असून तामिळनाडू, आंध्रप्रदेश, हरियाणा, पंजाब राज्यात त्याची चांगलीच मागणी आहे. त्यामुळे या संबंधीत कापड उद्योग सुत गिरणी  बाजार व्यवस्था जिल्ह्यात उभारण्यास सरकारने मदत करावी, जेणे करून जिल्ह्यातील लोकांना रोजगार मिळेल व मेक ईन इंडियाची संकल्पना साकार होईल. 
     जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती चांगली असून कापूस इंडस्ट्रीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या जिल्ह्यात सहा ते सात जिनिंग असून पारस ऍग्रो इंडस्टीज सर्वात जास्त कापूस प्रक्रिया करतो गेल्या १४ वर्षापासून ते या क्षेेत्रात काम करत आहेत. कापूस उत्पादक शेेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मध्ये चांगल्या प्रतीचे बियाणे वापरून पेरणी करावी. महाराष्ट्रात काही बियाणे बॅंन असून सुद्धा त्यांनी ते पेरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कृषी अधिकाऱ्यांमार्फत त्याविषयी माहिती घेऊन शेतकर्यानी चांगल्या जातीची एकसारखी पेरणी करावी. जेणेकरून नुकसान टाळता येईल व कापूस इंडस्ट्रीला चांगल्या प्रतीचा कापूस मिळेल. कापसाचा कोणताच भाग वाया जात नसल्याने हे पिक फायदेशीर आहे. कापसापासून सरकी आणि सरकीपासून ढेप व तेल याची मागणीसुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी स्वतः कृषी मार्गदर्शन शिबिर राबवण्याचे ठरवले आहे.
     तसेच बोंड अळीमुळे कापसाचे भाव ५२५० रू. क्विंटल पर्यंत पोहोचला असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस ५० टक्के विकण्यास काढावा. येणाऱ्या दिवसांत कापसाला चांगला भाव मिळू शकतो.
News - Chandrapur | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले