Today : 04:08:2020


विदर्भ स्तरीय कब्बडी स्पर्धेत महिला व पुरुषमध्ये नागपूरचे संघ अजिंक्य

वरोरा, अतुल कोल्हे :-   जयहिंद क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळ वरोरा स्व. सुनील धानोरकर स्मृती प्रित्यर्थ आ बाळू धानोरकर प्रयोजीत विदर्भ स्तरीय कब्बडी स्पर्धेत महिला व पुरुषमध्ये नागपूरच्या संघानी अजिंक्य पद पटकाविले.
     वरोरा शहरातील कॉटन मार्केटमध्ये उभारण्यात आलेल्या प्रा. ख. उत्तम मेश्राम स्टेडियममध्ये कब्बडी स्पर्धेचे उदघाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. चार दिवसीय चाललेल्या कब्बडी स्पर्धेत पुरुषाचे ४० तर महिलांचे ३० संघ सहभागी झाले होते. तसेच अंतिम सामन्यात एकलव्य क्रिडा मंडळ नागपूर संघाने शिवाजी क्रिडा मंडळ कोपराचा तर महिलांमध्ये विदर्भ क्रिडा मंडळ नागपूरनी वर्धा पोलीस वर्धा संघाचा पराभव करीत अजिक्य पॅड पटकाविले. पुरुषामध्ये काटोल क्रिडा मंडळ कोटोल या संघाने पटकाविले. जिल्हा स्तरीय कब्बडी स्पर्धेत प्रथम  पठाणपुरा व्यायाम शाळा चंद्रपूर, द्वितीय स्वामी विवेकानंद क्रिडा मंडळ मोहबाळा, तृतीय बांद्रा येथील संघाने पटकाविले एकलव्य क्रिडा मंडळ नागपूरचे प्रो कब्बडी खेळातून शशांक वानखेडे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. 
     तसेच स्पर्धेत बक्षिस वितरण आ बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले असून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विशाल बदखल, उपसभापती राजू चिकटे, नगर सेवक राजू महाजन, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख प्रमोद मगरे, आयोजन समितीचे संयोजक डॉ सागर वझे, जयहिंद क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव बाबा आगलावे, युवा सेने उपजिल्हा प्रमुख मनीष जेठानी, तालुका युवा सेना काशिफ खान यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.      
News - Chandrapur | Posted : 2017-12-25


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-