Today : 21:09:2020


रमाकांत श्रीधरराव लोधे जि प सदस्य यांच्या पुढाकाराने मोतीबिंदु तपासणी उपक्रम (३५३ रुग्णांना मिळाली दृष्टी.. ६५८ रुग्णांची तपासणी)

सिंदेवाही, अमर बुद्धारपवार  :-  सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ४९ वा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन चंद्रपूर लॉयन्स क्लब, सेवाग्राम मेडिकल कॉलेज च्या सहकार्याने घेण्यात आलेल्या मोतीबिंधु तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात ३५३ मोतीबिंदु रुग्णांना नवी दृष्टी मिळाली तसेच ६८५ रुग्णांची तपासणी या दरम्यान करण्यात आली. तसेच कार्यक्रम दरम्यान लोकोपयोगी उपक्रम दरवर्षी राबविण्याचा संकल्प सुद्धा श्री रमाकांत श्रीधर लोधे जि प सदस्य यांनी या ठिकाणी केला आहे. 
     तसेच रमाकांत श्रीधरराव लोधे जि प सदस्य चंद्रपूर व मित्र मंडळाच्या वतीने परिसरातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच दरवर्षी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासोबत सामाजिक कार्याची परंपरा सुरु ठेवली आहे त्यामध्ये रक्तदान, रोगनिदान, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबीर, वस्त्रदान शिबिराचे समावेश आहे. मागील १३ वर्षांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन श्री रमाकांत श्रीधरराव लोधे व मित्र मंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर २० गावाचा समावेश होते तसेच शेकडो गोर गरिबांपर्यंत हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. 
     तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ सुरेशजी बाकडे (प्राचार्य ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव, आमदार विजय वडेट्टीवार (प्रतोद विधानसभा), प्रमुख पाहुणे यादवरावजी मेश्राम (सरपंच पेंढारी), चंद्रकांत शिंदे (माजी प.स सदस्य सिंदेवाही), अरविंद किरीमकर, मेंडुलकर सर, भास्कर गजभिये, विलास चौधरी, डॉ प्रशांत नागपुरे (वैधकीय अधिकारी नवरगाव), घनशाम चौघे तसेच आदी उपस्थित होते.  
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेडिकल कॉलेज सेवाग्रामचे डॉ अजय शुक्ला यांच्या नेतृत्वात डॉ संतोष कर्मा, डॉ रवी डबसारे, सचिन ताकसांडे, सुशील वाणी आदींनी रुग्ण तपासणी केली श्री रमाकांत लोधे यांनी प्रास्ताविक केले तसेच संचालन इमान पठाण यांनी केले व आभार विलास चौधरी यांनी केले.  
News - Chandrapur | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..
आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार : आ.किर्तीकुमार भांगडिया

2018-02-04 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपुर 
चिमू