Today : 07:08:2020


पैसा नव्हे तर माणसे जोडणारा हृदयस्पर्श कार्यक्रम

"अनेकांना घडविणारेया अशोकराव देशमुख यांचा सत्कार करडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा पुढाकार"
रिसोड, महेंद्रकुमार महाजन :-   अनेकांना घडवून स्वत:न घडणारे या माजी सरपंच अशोकराव देशमुख यांचा सत्कार ग्रामपंचायत करडा, संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यासाठी युवकांनी पैसा नव्हे तर माणसे जोडणारा ‘ हृदयस्पर्श ’ कार्यक्रम स्वयंस्पुर्तीने करडा येथे आयोजीत केला होता. यावेळी या कार्यक्रमाला लोकनेते माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी जि.प. उपाध्यक्ष गजाननराव लाटे, माजी सभापती पं.स. सदस्य सुभाषराव खरात, प्रा. बि.एल. देशमुख, दौलतराव देशमुख, नारायणराव देशमुख, शरदराव देशमुख, पांडुरंगराव देशमुख, बाबाराव देशमुख, नानाराव देशमुख, सरपंच अशोकराव सपकाळ, प्रा. वसंतराव देशमुख, अ‍ॅड. गजाननराव देशमुख, अरविंद देशमुख, विलास देशमुख हे उपस्थित होते. 
     तसेच युवकांनी कुठलेही नियोजन न करता ‘ हृदयस्पर्श ’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी अचानक भेट देवून निष्टावंत कार्यकर्ते अशोकराव देशमुख यांचा सत्कार केला. लोकनेत्यांच्या सोबत आयुष्यभर राहणारे निष्टावंतांचाही माजी खासदार सत्कार करून सन्मान करतात. तेही स्वत:हून हे या कार्यक्रमात दिसून आले. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सध्याकाळच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी कडाक्याच्या थंडीत स्वत:हून पुढाकार घेवून ‘ हृदयस्पर्श ’ कार्यक्रम यशस्वी करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
     यावेळी अनेकांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. निळवंठ देशमुख यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. वसंतराव देशमुख यांनी केले. आभार अ‍ॅड. गजानन देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस पाटील भानुदास कष्टे, युवा नेतृत्व जीवन देशमुख, ज्ञानेश देशमुख, विनोद देशमुख, निलेश देशमुख, प्रा. जानराव देशमुख, प्रा. संतोष देशमुख, भाणुदास देशमुख, विलास देशमुख, सतीष देशमुख, संभाजी ब्रिगेडचे अमोल देशमुख, प्रसाद देशमुख, किरण देशमुख, प्रविण देशमुख, अंकुश देशमुख, संदिप देशमुख, भागवत कष्टे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष विनोद देशमुख यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले. अनियोजत कार्यक्रमाला ग्रामस्थांच्या पुढाकाराने भव्य स्वरूप प्राप्त होवून भावना व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमातून पैसा नव्हे तर माणसे जोडणारा ‘ हृदयस्पर्श ’ कार्यक्रम असल्याचे सिध्द झाले. कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, युवक, संभाजी ब्रिगेड, ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेतला होता.
News - Washim | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli