Today : 14:08:2020


वनसडीचे वनपाल भरडकरांच्या भोंगळ कामांची चौकशी करा (शेतकऱ्याची मागणी)

गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-  कोरपना तालुक्यातील वनसडी बिट वनपाल भरडकर हे सध्या उंटावरुन शेळ्या हाकत असल्याचे प्रतित होत आहे.हम करे सो कायदा, या प्रमाणे कामे सुरू असून वनविभागाच्या वरिष्ठांनी एक वेळा यांच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी अशी मागणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यानी केली आहे.
     वनप्राण्यांनी तलुक्यातील शेतकयांच्या उभ्या पिकानचे नुकसान केले.या संबंधी चौकशी व पंचनामे तयार करून पाठविण्याचे आदेश शासनाने दिले. माञ भरडकर यांनी ५०० द्या पंचनामा घ्या, अशी युक्ती वापरत ज्यांचे काहीच नुकसान झाले नाही अशांना पैसे घेऊन खोटे पंचनामे बनवुन देत असल्याचे आरोप होत असून या कृत्यामुळे वनपाल सर्रासपणे शासनाची फसवणुक करून खरे लाभार्थी व नुकसानग्रस्त शेतकयांवर अन्याय करीत असल्याची शंका व्यक्त होत आहे. 
     तसेच गडचांदुर, वनसडी वन परिक्षेत्रात वन्यप्राणी व रानटी डुकरांनी केलेल्या पिकांची नासाडीची नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यानी संबंधित विभागात अर्ज दाखल केले. मात्र नुकसानग्रस्तासह प्रत्यक्षात ज्यांचे नुकसान नाही झाले अशा कडुन वनपाल खडणी वसुली करून वन विभागाला अक्षरश: चुना लावत आहे. बेलगाव, नारंडा, धांनोली, वनसडी, सोनुर्ला, आसन पिपर्डा, चिंचोली, ईंजापूर येथील पिक नुकसानीची फेर चौकशी तसेच वनक्षेत्रात नसलेल्या तांडा गॅस सिलेंडर व नियमबाह्य केलेल्या बांबु वाटपात मोठा घोटाळा व बांबुसाठा विक्रीत झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी केल्यास वास्तविक्ता पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
     २४ डिसेंबर रोजी  वनक्षेत्रातुन बाईकवरून साग लाकुड नेताना वन समितीने एकाला अडविले असता, त्याने मी भरडकर साहेबाला विचारून लाकुड नेत असल्याचे सांगुन वाद घालत पोबारा केला. वनक्षेत्रात चोरीचे प्रमाण वाढले की कुंपनच शेत खात आहे,कळेनासे झाले असून सदर वनपाल करीत असलेले पंचनामे, बांबु व गॅस वाटप या सर्व प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी शेतक~यांनी केली आहे.वनविभाग कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-26


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli