Today : 04:08:2020


बिबट अडकला वनविभागाच्या पिंजऱ्यात (सिंदेवाही कृषी उत्पन्न परिसरातील लोनवाही ची घटना)

सिंदेवाही, अमर बुध्दारपवार  :-  सिंदेवाही परिसरात वन हिस्त्र पशुची दहशत मागील एक महिण्यापासून सुरु आहे. मागील काही दिवसापूर्वी पट्टेदार वाघाने सिंदेवाहीच्या महिलेला ठार केले होते. त्यानंतर सिंदेवाही परिसरात पाच पट्टेदार वाघ दिसल्यांची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र त्या नरभक्षक वाघाला पकडण्यास एफ.डी.सी.एम. व वनविभाग कुचकामी ठरले मात्र आज एक महिण्यापासून बिबटयाला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात सकाळ सुमारास बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसून येताच बिबट अडकल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच जेरबंद बिबट्याला बघावयास बघ्याची गर्दी निर्माण झाली.
     तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरील कॉलनी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे परिसरात मागील एक महिनापूर्वी पासून बिबटयाचे अस्तित्व आढळून आले होते. त्यामुळे कॉलनी परिसर लागून असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या बिबटयाचा बंदोबस्त करण्यासाठी एक महिण्यापासून त्या परिसरात पिंजरा ठेवण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात रोज रात्रौच्या सुमारास कुत्रा ठेवण्यात येत होता. मात्र बऱ्याच दिवसानंतर कॉलनी परिसरातील शिकारीच्या शोधात कुत्र्यांच्या मागावर असलेला बिबट वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबटयाला बघण्यासाठी मोठयाप्रमाणात गर्दी झाली. वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत घटना स्थळी दाखल होवून त्या बिबट्याला कुठे हलविणार याबद्यल निर्णय घेतील त्यानंतरच घटनाक्रम कळेल असे क्षेत्रसहाय्यक करंडे यांनी विदर्भ टाईम न्युज सोबत बोलतांना सांगितले.




News - Chandrapur | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli