Today : 04:08:2020


भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी बाबासाहेबांच्या व राष्ट्रसंतांच्या विचारधारेवर चालणारे सरकार : आ.किर्तीकुमार भांगडीया

चिमूर फिरोज पठाण :-  राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे दिनदुबळ्यांच्या, शेतकऱ्यांच्या सदैव पाठिशी असून बाबासाहेबांच्या, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेवर चालणारे सरकार आहे. असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय बंटीभाऊ भांगडिया यांनी केले असून ते चिमूर मतदार संघातील चिमूर तालुक्यातील केसलाबोडी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी तसेच नवनिर्मित समाज मंदिराचे उद्घघाटन प्रसंगी बोलत होते. पंचायत समितीचे सदस्य पुंडलिक मत्ते, अजहर शेख, शांतारामजी चौखे, जिल्हा परिषद सदस्या रेखाताई कारेकार, शांतारामजी सेलवटकर, बारसे साहेब, मनीषा श्रीरामे आदि याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
     तसेच आमदार किर्तीकुमार भांगडिया पुढे म्हणाले कि, गुरुदेवांच्या व बाबासाहेबाच्या विचार सरणीनेच या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साध्य होणार असून चिमूर क्षेत्रातील विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. शेतकऱ्यांचे  ग्रामस्थांचे विज, पाणी, रस्ते असे विविध प्रश्न बऱ्यांच प्रमाणात मार्गी लागले आहेत. वेळप्रसंगी उद्भवणारे जनतेचे  विविध प्रश्न तातळीने सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे गोरगरिबांच्या विकास साधणारे सरकार असून चिमूर क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, जनतेच्या विश्वासावर खरें उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. 
     तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेद्वारे देशातील आई बहिणींना धुरमुक्त, चुलमुक्त करण्याचे स्वप्न बघितले आहे,  चिमूर विधानसभा क्षेत्रातील आई बहिणींना चूलमुक्त धुरमुक्त करण्यासाठी ज्या आई बहिणींकडे गॅस कनेक्शन नाही त्यांनी नवीन गॅस कनेक्शनसाठी  फॉर्म भरून द्यावे, त्यांना लवकरात लवकर नवीन गॅस कनेक्शन केवळ १०० रु. उपलब्ध करून देण्यात येईल. असे ते पुढे म्हणाले. याप्रसंगी केसलाबोडी येथील विविध समस्या यावेळी माननीय आमदार बंटीभाऊ यांनी जाणून घेतल्या, तसेच येथील शाळेत पाण्याची समस्या लक्षात घेता त्वरित बोरवेल लाऊन देण्याचे त्यांनी निर्देशही दिले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे र