Today : 14:08:2020


पतंजली योग समितीद्वारे महिला मार्गदर्शन शिबीर

चिमूर, फिरोज पठाण :- पतंजली योग समिती शाखा चिमुरचे वतीने पतंजली महिला सशक्तीकरण मार्गदर्शन कार्यक्रम तथा एक दिवशीय योग प्राणायम शिबीर नुकतेच चिमूर येथील अभ्यंकर मैदानावर पार पडले असून एक दिवशीय योग प्राणायम शिबीर तथा मार्गदर्शन दरम्यान सूर्य नमस्कार, प्राणायम प्रकार, योगासने तथा स्वदेशी, स्वछता या विषयावर भर देण्यात आला. अकोला येथील पतंजली योग समितीच्या तथा महिला राज्य प्रभारी भरती शेंडे, राज्य कार्यकारणी सदस्य संजीवनी माने, जिल्हाप्रभारी सुधाताई साधनकर, ज्योती मसराम यांनी याप्रसंगी विविध विषयावर मार्गदर्शन केले. 
     याप्रसंगी चिमूर तालुका प्रभारी पुष्पाताई हरणे, तालुका प्रभारी रमेश कांचर्लावार, उपाध्यक्ष राम चिचपाये, गुणवंत चटपकार, गिरीधर कामडी, संध्या चरपे, दुर्गा वरघने, आशिष शेख, भरती बंडे, वनिता मेहरकुर, सलमा शेख, प्रिती डोलेबांधे, निशा मिसार, शुभांगी तळवेकर, सेरेखा कामडी, अरुणा चिचपले, प्रफुल बत्तेवार, लता सातपुते आदी उपस्थित होते. 
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रभारी पुष्पा हरणे तर संचालन तडस यांनी केले. त्यावेळी चिमूर येथील अभ्यंकर मेंदाम परिसर स्वछता अभियान अंतर्गत सर्व महिला पतंजली शिबिरार्थींनी परिसर स्वछता केली.         
News - Chandrapur | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur