Today : 04:08:2020


राष्ट्रसंताचे विचार आचरणात आणने गरजेचे - आ.किर्तीकुमार भांगडीया

चिमूर, फिरोज पठाण :-  गेल्या अनेक वर्षांपासून गुरुदेवाचे विचार ऐकत आहोत त्या ग्रामगीतेतील विचार आपण आचरणात आणले का ? आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले कि,  राष्ट्रसंताचे विचार सर्व जनतेच्या मनात आचरणात आणले पाहिजे अनेक गावांत ध्यान केंद्र बांधकाम करून घ्यायचे आहे गोंदेडा तपोभूमी विकास कामे चालू आहे. हातपंपाचे काम सुद्धा जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविले असून आमचे सरकारने ग्राम पंचायतला पूर्ण अधिकार देऊन गावाच्या विकास करण्यासाठी अधिकार दिले आहे. 
     ग्रामसभेत ठराव करून नियोजन केंद्र व राज्य सरकारने ग्राम सभेला दिले आहे. गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांची बिकट स्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मांडली शेतकरी बांधवासाठी कोरड, ओलित, शेतकऱ्यांना आर्थिक मदत घोषित केली आहे. कर्जमाफी करून कर्जमुक्ती करण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजवला गॅस योजने अंतर्गत गॅस पुरवठा करण्यात येत असून उर्वरित ज्या कुटूंबाकडे गॅस नसेल त्यांना गॅस मिळून काजळ सर चूल मुक्त करणार असल्याचे सांगितले. 
     श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा ग्रामवासी काजळसर चे वतीने आयोजीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ४९ वी पुण्यतिथी महोसत्व कार्यक्रमात आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्यामजी हटवादे सरपंच अश्विनी मेश्राम, रामदासजी जांभुळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा उपसरपंच कलीम शेख, प.स. माजी उपसभापती विलास कोराम, माजी सरपंच भिमराव हटवादे, बंडू जावळेकर, सुनील किटे, लालाजी मेश्राम, संजय राचलवार आदी उपस्थित होते. 
     यावेळी डॉ श्यामजी हटवादे म्हणाले कि, किर्तन व आचरण करण्यासंबधी बोलत पुढे म्हणाले कि, दुसऱ्याची टिका टिपणी करण्या पेक्षा आ. भांगडीया हे बोले तैसा चालणारे आमदार लाभले असून या पूर्वी ३५ वर्षा पासून केवळ पोकळ आश्वासन पाहिले गुरुदेव व्यासपीठ हे राजकारण करणार नसून या विचार मंचावर ध्यानातून काहीतरी साध्य केले पाहिजे प्रार्थना झाल्यावर गावातील समस्यावर चर्चा करा अशी शिकवण ग्रामगीतेतून केली असे आचरण करण्याचे सांगितले. ग्रामगीतेतील शब्द बद्दलविण्याचे कट कारस्थान चालू आहे व राम, कृष्ण यांची परंपरा सुद्धा बद्दलविण्यात येत आहे हे आम्ही कदापी सहन करणार नाही काजळ सर तलावाचे काम, शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि आर्थिक मदत जाहिर केली आहे. सरपंच अश्विनी मेश्राम यांनी गावातील विविध समस्या सांगून त्या विषद केल्या. दरम्यान मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंताचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्तावीक व संचालन  देवानंद कावळे यांनी केले. तसेच गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने साफसफाई, ध्यान, घट स्थापना, मिरवणूक व किर्तन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-27


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू