Today : 04:08:2020


अवैध दारू गुन्ह्यातील आरोपीचा जिवंत तारला स्पर्श करून आत्महत्या : पहा कुठली आहे घटना

" पोलीस विभागात उडाली खडबड.. चंद्रपुर जिल्ह्यातील पहिलीच घटना.. या प्रकरणाची होणार सी.आय.डी. चौकशी : उपविभागीय अधिकारी प्रताप पवार "
विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चंद्रपूर, अतुल कोल्हे :- 
अवैध दारू गुन्ह्यातील आरोपी दिवाणी व फौजदारी न्यायालयातून पोलिसांच्या हाताला तुरी देऊन पळ काढला आणि थेट उच्च दाब असलेल्या टावर वर चढून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली असून या घटनेमुळे पोलीस विभागात खडबड उडाली आहे. तसेच आरोपी देवकुमार बेडु कोराम, २४ राहणार मातानगर चौक भिवापूर लालपेठ चंद्रपूर येथील रहिवासी आहे. जून २०१७ मध्ये आरोपी वर अवैध दारू गुन्ह्या बाबत गुन्हा नोंदविला गेला होता या प्रकरणात तो पसार होता. त्याला २६ डिसेंबर पोलिसांनी अटक केली २७ डिसेंबर न्यायालयापुढे हजर करण्याकरिता पोलीस शिपाई शहबाज सय्यद व श्रीकांत यांनी नेले. न्यायालयात प्रक्रिया सुरू असतांना आरोपी देवकुमार याने इतर २ आरोपींना माझे जमानत घेणारे कोणीही नसल्याने मला जेलमध्ये जावे लागेल अशी मत व्यक्त केली आणि काही क्षणातच त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देवून पड काढला. 
     तसेच न्यायालया पासून १ किलोमीटर चंद्रपूरकडे महामार्गाच्या बाजूला असलेल्या उच्च दाब विद्युत वहिनी टावर वर चढला हा प्रकार अनेकांनी पाहिला त्याला खाली उतरण्यासाठी लोकांनी विनंती केली परंतु मला जेल होईल मला जेल मध्ये जायचे नाही. असा तो ओरडून सांगत होता आणि याच आवेशात त्याने जिवंत विद्युत ताराला स्पर्श करून आत्महत्या केली. जखमी अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेला असता तो वाटेतच मरण पावला. या घटनेमुळे पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली अवैध्य दारू व्यावसायिकाने अशी टोकाची भूमिका घेण्याची हि जिल्ह्यात पहिलीच घटना आहे. पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेले पोलीस उपविभागीय अधिकारी प्रताप पवार यांनी या प्रकरणाची सी आय डी चौकशी होणार असल्याचे सांगितले घटनेचा प्राथमिक तपास ठाणेदार बी डी मडावी करत आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक