Today : 04:08:2020


टाटा सुमोने दुचाकीला दिली धडक १ ठार २ गंभिर जखमी (खरकाडा येथील घटना)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
चिमूर, फिरोज पठाण :-
चिमूर वरून ६ कि.मी. अंतरावर खरकाडा समोरील वळणावर सुसाट वेगाने परतीचा मार्गावर असलेल्या टाटा सुमो क्र. एम.एच. ३१ ए.एच. ५०३७ वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली असल्याने अपघातामध्ये श्रावण जांभुळे (खरकाडा वय ५५), याचा चिमूर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच गंगाबाई श्रावण जांभुळे (वय ४५) व नशीब बलवत्तर असल्याने उत्कर्ष प्रवीण जांभुळे (वय 5) वर्ष अपघातात त्याचा पाय फॅक्चर झाला आहे. 
     तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले असता श्रावण जांभुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात झालेले व्यक्ती खरकाळा येथील असून ते पिंपळगाव वरून गावाकडे येत असतांना गावालगतच त्यांचा अपघात झाला. तसेच धडक देणारा आरोपी हा गाडीसह पळ काढला असून त्याला भिसी पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आले आहे. पवन शामराव मुनघाटे (वय २४ रा. हिरापूर) असून तो साक्षगंध कार्यक्रमाला मुरपार येथे गेला होता. त्याला चिमूर पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून समोरील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सोनूले करीत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur