Today : 08:08:2020


पटसंख्ये अभावी आय.एस.ओ. जि.प. शाळा बंद (विद्यार्थ्यांचा इतर शाळेत जाण्यास बहिष्कार)

"४०० पेक्षा अधिक शिक्षकांनी भेटी दिलेली नामवंत शाळा.. पालकांचा व विद्यार्थ्यांचा एल्गार"
विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
संदीप गव्हारे / चंद्रपुर  :- 
एकीकडे एकही विद्यार्थी शाळाबाह्य़ राहू नये यासाठी शासनाकडून कसोशीने प्रयत्न केल्या जातात. दुसरीकडे मात्र शासनाने अस्तित्वात असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांनी विद्यार्थ्यांसह गेडामगुडा येथील शाळेसमोर निदर्शने केले. इतर शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास पालकांनी बहिष्कार केले आहे.
     कोरपना तालुक्यातील गोविंदपूर, गेडामगुडा, कोठोडा (खुर्द), चेन्नई (खुर्द) व भोईगुडा अशा पाच जि.प. शाळा १० पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळे बंद करण्यात आल्या आहे. बिबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गेडामगुडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण आठ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेला आय.एस.ओ. दर्जा प्राप्त झाला असून आजपर्यंत जवळपास चारशे शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. हि उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या शाळेतील आठही विद्यार्थी इंग्रजी विषयात तरबेज आहेत. नुकत्यात झालेल्या बिटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत या आठही विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. गावातील लोकांनी लोकसहभागातून या शाळेला घडविले असल्यामुळे शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे गावकऱ्यांना धक्का बसला आहे.
     तसेच २०१२-१३ सत्रा पासून प्रगत शाळा म्हणून या शाळेने नावलौकिक मिळवला असून शाळेने गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. असे असताना शासनाच्या दहा विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयात या शाळेचा समावेश आहे. मात्र गावातील पालक आपल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या कोणत्याही शाळेत पाठविण्यास तयार नाही. गेडामगुडा येथील आय.एस.ओ. शाळा सुरू न केल्यास शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर आम्ही गावकरी आमरण उपोषण करू असा इशारा सरपंच मंगलदास गेडाम यांनी दिला आहे.

           " स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील शाळा असून गावकऱयांच्या साथीने या शाळेचा विकास झाला आहे. गावकऱ्यांनी खूप मोठय़ा प्रमाणात मेहनत घेतली आहे. शाळेतील शैक्षणिक व भौतिक वातावरण प्रसन्न आहे. अशा शाळेला बंद करणे विद्यार्थी हिताचे नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ आहे. - (मंगलदास गेडाम,  सरपंच, ग्रामपंचायत बिबी)

          " आम्ही श्रमदानातून शाळा घडवलेली आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवलेली आहेत. एका शंभर टक्के आदिवासी पाड्यावरील शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय घातक आहे. आम्ही इतर शाळेत विद्यार्थी न पाठवता आमच्याच शाळेत विद्यार्थी पाठवू. अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांना घरी ठेवू. (किशोर गेडाम, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती)

          ' गाव तेथे शाळा ' हे शासनाचे ब्रिद वाक्य होते. ठिकठिकाणी आदिवासींनी छोटे - छोटे पाडे व गुडे तयार करून आपल्या वस्त्या निर्माण केल्या. शहरी, ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त असे वेगवेगळे निकष ठेवून शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे. मात्र तसे न करता सरसकट दहा पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या निर्णयाविरोधात आपण आवाज उठवू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी ह्या संदर्भात आपले मत व्यक्त केले. (हा तर आदिवासी लोकांवरील अन्याय आहे - सुभाष धोटे) 
News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliअहेरीत पत्रकार दिन