Today : 14:08:2020


पोलिस स्टेशन मुलचेरा तर्फे मौजा बंदुकपल्ली येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
निरज चापले / मुलचेरा  :- 
काल दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी मा. अप्पर पोलिस अधिक्षक श्री. ए.राजा अहेरी, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. गजानन टोम्पे अहेरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन मुलचेरा तर्फे मौजा बंदुकपल्ली येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिकराव सेडमाके, सरपंच ग्रा. प.कोठारी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुतार सर, श्री लाकडे साहेब कृषी विभाग, तसेच मिलींद पाठक पोलिस निरीक्षक, श्री मोरे पोलिस उपनिरीक्षक उपस्थित होते.  
     तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबोरे मुक्यामंत्री ग्राम परिवर्तक कोठारी हे होते. सदर मेळाव्यात व्हालीबॉल स्पर्धा, चित्र कला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करुन शासनाच्या वतीने आरोग्य विभाग, वनविभाग, म.रा.वि.वि. मुलचेरा, मुव्तीपथ, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, ग्राम पंचायत आदी विविध विभागांनी आप आपले स्टॉल लावुन लोकांना शासनाच्या योजनांची माहिती देवुन व विविध प्रकारचे दाखले वाटप करुन आरोग्य तपासणी करण्यात आली. 
     तसेच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस - स्पोर्ट किट, व्हलिबॉल, व्हलिबॉल नेट, वह्या पुस्तके, पेन आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे जेष्ट नागरिकांना चादर वाटप करण्यात आले. जनजागरण मेऴावाल्या उपस्थित जन समुदयाला भोजन दानचे आयोजन सुद्धा करण्यात आले. सदर मेळाव्यात भगवंतराव आश्रम शाळा मूलचेरा व राणी दुर्गावती शाळेच्या चमूने देशभक्तीपर नृत्य सादर केले दरम्यान परिसरातील ३५० ते ४०० नागरीक  उपस्थित होते. सदर मेऴाव्यात नक्षल विरोधी गावबंदी योजना तसेच स्थानिक तरुणांना पोलिस विभागास सहकार्य करण्याचे आव्हाण पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थिती चापले सर, पोटदुखे मॅडम, राठोड मॅडम पोलिस कर्मचारी तसेच उपस्थितांचे आभार आखाडे मेजर यांनी मानले. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli