Today : 04:08:2020


नवरगाव पोलीस चौकीचा कारभार वाऱ्यावर.. (दोन पोलीस कर्मचाऱ्यावर कारभार.. कायम स्वरुपी फौजदाराची मागणी)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले नवरगावात पोलीस चौकी आहे. या चौकी अंतर्गत विस गावे येत असून ५० ते ६० हजार नागरिकांचा कारभार चालतो. मात्र या चौकीचा कारभार दोन पोलीस सांभाळीत आहे. कायम स्वरूपी फौजदाराचे पद आवश्यक असतांना फौजदार चौकीत दिसत नसल्याने चौकीचा फौजदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने कायम स्वरुपी फौजदारासह पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
     तसेच नवरगाव परिसरात अवैध धंदयाला ऊत येत असून दिवसेंदिवस अवैध दारू विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. मागील गुरुवारला चंद्रपूर एल.सी.बी. पथकाने धाड टाकून लाखो रूपयाची दारू हस्तगत करून कारवाई केली. मात्र सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक पोलीसाकडून कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांत शंका निर्माण होत आहे. नवरगाव पोलीस स्टेशनची मागणी कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र प्रशासन स्तरावरून गुन्हयाचे प्रमाण कमी असल्याचे कारण पुढे केले जाते. चौकीत कर्मचारी कमी असेल तर कारवाई कशी होणार ? असा प्रश्न उपस्थित होतो. कर्मचारी दोन असल्यामुळे पोलीस चौकी रामभरोसे असल्याचे चित्र नागरिकास पहावयास मिळते. सर्वांअधिक गुन्हे अवैद्य दारूचे होत असले तरी चिल्लर दारूविक्रेत्यावर कारवाया होतांना दिसतात. 
     मात्र मोठया पुरवठा दारावर कारवाई होत नसल्याची ओरड जनतेत केली जाते. कमी मेहनतीत जास्त पैसा कमाविण्याच्या नादात तरूण पिढी गुरफटली जात आहे. कारवाई होवूनही पुन्हा त्याच धंदयात पडत असेल तर त्या कारवाईला अर्थ काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवैद्य दारू विक्रेते कुणाला जुमानत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दारूबंदी समित्या निर्माण करण्यात आल्या मात्र त्याही कागदावरच आहे.
     तसेच कायम स्वरूपी स्थायी फौजदार व कमी पोलीस कर्मचाऱ्या अभावी पोलीस चौकीचा कारभार रामभरोसे असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याने पोलीस अधिक्षकांनी नवरगाव पोलीस चौकीकडे लक्ष केंद्रीत करून स्थायी फौजदारासह पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकात जोर धरत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur

चिमुर :- चिमुर तालुक्य