Today : 08:08:2020


राष्ट्रसंताची तपोभूमी ‘गोंदेडा येथे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामिण कौशल्य विकास केंद्र’ स्थापण करण्याकरीता मुख्यमंत्री यांना निवेदन

‘ ग्रामनिर्माण बहुउद्देषिय संस्था खांबाडा ’ यांचा पुढाकार
विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
नेरी, पंकज रणदिवे :- 
चिमुर तालुक्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सन्मानार्थ तसेच कृषी, रोजगार व ग्रामिण विकासा करीता कौशल्य विकासात्मक तसेच वेगवेगळया अश्या २४ मुद्दयाचे निवेदन ‘ग्रामनिर्माण बहुऊद्देषिय संस्था खांबाडा’ च्या वतीने अर्थमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार, खासदार अशोक नेते व आ. किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांना सादर करण्यात आले तसेच यांच्या हस्ते निवेदन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांना पाठविण्यात आले आहे.
     तसेच भारत सराकारचे २०२२ पर्यंत कौशल्य विकास व स्वयंरोजगाराचे लक्ष असुन त्यासाठी सराकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामिण कौशल्य विकास योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या उद्दिष्टांकरिता सुरु केलेल्या आहेत. तसेच राज्यातील बेरोजगारीची तिव्रता कमी करण्यासाठी बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत असलेले महामंडळ तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रा मार्फत स्वयंरोजगारासाठी इच्छुक उमेदवारांना प्रोत्साहन तसेच कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. तरी पण त्या योजनांची उद्दीष्टे व यशस्वीता योग्य लाभार्थीच्या निवडीवर अवलंबुन आहे. 
     लाभार्थ्याला खरोखरच लाभ होण्यासाठी योजना सुलभ आणि पारदर्षीपणे राबवणे आवश्यक असुन कौशल्य विकासाची प्रशीक्षण केंद्रे ही जिल्हा व तालुका पातळीवर खेळेगावा पासून दूर असल्याने याचा लाभ ग्रामीण भागात मिळत नाही. तसेच ग्रामीण लाभार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रापर्यंत येणे - जाणे व तिथे निवासी राहने शक्य व परवडण्याजोगे नसुन उमेदवाराला भविष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याची खात्री वाटत नाही. त्यामुळेच स्वयंरोजगार प्रशिक्षण करीता सामान्यपणे कोणतीही व्यक्ती सहसा प्रवृत्त होत नाही. तरी आर्थिक स्थैर्याची शाष्वती मिळवून देण्याकरीता हे कार्यक्रम ग्रामीण पातळीवर राबविल्या गेले तर आर्थिक स्थैर्याची शाश्वती मिळून ग्रामीण खळे विभाग स्वयंपुर्ण होईल.
     भारत हा देश कृषीप्रधान असुन खेडयांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की देशाचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रदधा व विचारसरणी होती. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिदूच होता. ग्रामविकासाकरीता ग्राम हे सुशिक्षित व्हावे. ग्रामोद्योग संपन्न व्हावेत. गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात. ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. ग्रामगीतेचे लेखन त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असुन अस्पृश्यता, अंधश्रदधा व जातिभेदाच्या निर्मूलनाचे, विचार ग्रामगीतेुन मांडले. महिलोन्नती व्हावी, तरुनांनी समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करुन नितिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील तसेच व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतानी ग्रामगिता लेखनातून दर्शविला.
     राष्ट्रपतिभावणा झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तूकडोजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून पदवी बहाल केली. तसेच भारतीय डाक विभागाने सूद्धा राष्ट्रसंताच्या नावाने ‘स्मारक तिकीट’ निर्माण करुन त्यांना सन्मानीत केले होते. त्याचप्रमाणे नागपुर विद्यापिठाला सूद्धा त्यांच्या सन्मानार्थ ‘राश्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठ’ नाव देण्यात आले. विदर्भात त्यांचा विषेश संचार असला तरी महाराश्ट्रभरच नव्हे तर देषभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राश्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. जपानसारख्या देषात जाऊन त्यांनी सर्वांना विष्वबंधुत्वाचा संदेष दिला. म्हणुनच या राष्ट्रसंताच्या श्रद्धा व विचारसरणीवरच संपुर्ण ग्रामिण विभाग कार्यरत असुन त्यांच्या कार्याचा ठेवा म्हणून खालील योजना सुरु करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.
     तसेच  वेगवेगळ्या मुद्यांबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सन्मानार्थ कृषी, रोजगार व ग्रामीण विकासासाठी विविध २४ मागण्यांसाठीचे निवेदन  अमोल गजभे, अध्यक्ष ‘ग्रामनिर्माण बहुउद्देषिय संस्था’ तथा ‘उत्कर्श सार्व. वाचनालय’ खांबाडा ता. चिमुर  जि. चंद्रपुर यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य, गुरुदेवभक्त तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli