Today : 08:08:2020


भाग्यश्री पतसंस्थेच्या वतीने जि.एस.टी. कराविषयी मार्गदर्शन शिबिर (रौप्य महोत्सवी वर्षातील उपक्रम)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार  :- 
भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव चे वतीने संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचीत्याने सिंदेवाही शाखा कार्यालयाद्वारे नुकतेच जि.एस.टी. कराविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगरपंचायत सिंदेवाही चे मुख्याधिकारी मंगेश वासेकर, प्रमुख मार्गदर्शक चंद्रपूर येथील प्रतिथयश सी.ए. कमलकिशोर राठी, संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश चिंतावार, संस्थेचे उपाध्यक्ष महादेव लंजे प्रभृती मंचावर विराजमान होते. 
     याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक कमलकिशोर राठी यांनी  जि.एस.टी. म्हणजे काय ? जि.एस.टी. व  व्हॅट यांमधील फरक, जि.एस.टी. च्या कक्षेत येणाऱ्या व न येणाऱ्या बाबी कोणत्या, रिव्हर्स चार्ज यंत्रणा म्हणजे काय ? रिटर्न भरण्याच्या पद्धती कोणत्या, जि.एस.टी. कराबाबत कोणकोणते रेकार्ड अद्ययावत ठेवावे लागतील इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले व उपस्थितांचे कराविषयी असलेल्या विविध विषयावर शंकेचे निरसन केले.
     तसेच प्रमुख अतिथी मंगेश वासेकर म्हणाले, भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजीत केलेला कर विषयक मार्गदर्शनाचा हा कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद असुन सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा आहे. करांविषयी असलेल्या बऱ्याच शंकेचे निरसन या निमित्ताने झाले. सामाजिक दायीत्व असेच सतत जोपासल्यास संस्थेची प्रगती उत्तरोत्तर होत राहील असा विश्वास व्यक्त करून संस्थेच्या उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रमाला सिंदेवाही परिसरातील ग्राहक, संस्थेचे शुभचिंतक बहुसंख्येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण मानुसमारे तर प्रास्ताविक डॉ.सतीश चिंतावार व आभार महादेव लंजे यांनी मानले प्रकाश निकोडे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-28


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

वि