Today : 14:08:2020


अखेर त्या दोन्ही पुलिस कर्मचाऱ्यांना केले निलंबीत घटना (पोलिसांच्या हातातुन पळ काढून आरोपीने केली आत्महत्या)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
चंद्रपुर, अतुल कोल्हे  :- 
अवैध्य दारू तस्करीमधील आरोपीने केलेल्या आत्महत्येतील प्रकरणामध्ये चंद्रपुर जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी गुरुवारला सैयद शाहाबाद व श्रीकांत देउलवार या दोन्ही पोलिस कर्मच्याऱ्यांना निलंबित केले. सविस्तर वृत्त असे आहे कि, अवैध्य दारू गुह्यातील आरोपीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला आणि थेट उच्चदाब विजेच्या टावरवर चढून जीवंत तारेला स्पर्श करुण आत्महत्या केली होती. या घटनेस गांभीर्याने घेऊन गुरुवार ला चंद्रपुर जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी आरोपिला न्यायालयात घेउन जाणाऱ्या पोलिस कर्मचारी सैयद शाहाबाद व त्याचा जोडीदार श्रीकांत देउलवार यांना निलंबित करुण पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 
     तसेच मृतक आरोपी देवकुमार कोराम यांच्यावर जून २०१७ मधे अवैध्य दारूचा गुन्हा नोंदविन्यात आला होता.  भद्रावती पोलिसांनी आरोपीला अटक करुण २७ डिसेंबरला दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे हजर करण्या करीता आणले होते, मात्र तिथुन पोलिसांना चकमा देऊन पळ काढला व महामार्ग जवळील कटारिया ले - आउट मध्ये असलेल्या उच्चदाबाच्या वहिनी वर चढून जिवंत तारेला स्पर्श करुण त्याने आत्महत्या केली. हा प्रकार अनेकांनी पहिला. त्याला खाली उतरण्यासाठी अनेकांनी विनंती सुद्धा केली. परंतु " मला जेल होईल, मला जेलमध्ये जायचे नाही " असे तो ओरडुन सांगत होता. आणि त्यांच आवेशात त्याने जिवंत तारेला स्पर्श करुण आत्महत्या केली. जखमी अवस्तेत त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता तो वाटेतच मरण पावला. या घटने मुळे पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विज