Today : 14:08:2020


भामरागड (बेजुर कोंगा) येथील बाबलाई माता पूजा उद्यापासून

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
प्रतिनिधी, भामरागड  :-
  भामरागड़ (परिसर) पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने दिनांक ३० डिसेंबर २०१७ ते ०१ जानेवारी २०१८ पर्यंत " बाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपारिक संमेलन " चे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाचे प्रतिक असलेल्या " बाबलाई माता " बेजुर या गावाळ असलेल्या बेजुर कोंगा पहाड़ीवर वसलेले आहे. आदिवासी आणि निसर्ग यांचे अतूट संबंध आहे. आदिवासी  निसर्ग पूजक आहे. आदिवासींचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे. म्हणून निसर्गाला दैवत मानून तो त्याची पूजाही करतो. जगातील अनेक विचरवंतांनी व अभ्यासकानी आदिवासी समाजाकडून खूप गोष्टी शिकन्यासारखे आहेत असे सांगितले आहे. तरी आज या चंगळ्वादाच्या दुनियेत आपण त्यांच्या विचारांकड़े दुर्ललक्ष करून त्यांच्या जंगलावर व जमिनीवर कब्जा करत आहोत. त्यांना त्यांच्या जमिनीतुन बेदखल करत आहोत. आणि तेही त्यांच्याच विकासाच्या नावावर म्हणून जल, जंगल, जमिनीच्या संरक्षणासाठी आता पट्टी, इलाका एकत्र येत आहेत. 
     आपला जल, जंगल, जमिनिवारील दावा मजबूत करण्यासाठी संघर्ष करत आहेत. भाषा, धर्म, संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी एक होऊन आपला आवाज बुलंद करत आहेत. त्यांच्या स्वतः च्या रचनेचे प्रतिक असलेल्या गोटूल संस्थेवर आक्रमण होत आहे. विशेष म्हणजे गोटूल मध्ये बसून निर्णय घेन्याच्या प्रक्रियेला व्यावस्थेकडून विरोध होणे, हे या क्षेत्रातील समग्र आदिवासी  समुदायाच्या अस्तित्व व अस्मितालाच धोका आहे. आज भामरागड़ तालुका देशाच्या नकाशात अनेक कारणांनी अधोरेखित केला गेला आहे. त्यापैक्की काही उदाहरणे असे की, भामरागड़ तालुक्यातील लाहेरी व कियर यूनिट मधील काही  ग्रामसभांनी २०१७ च्या तेंदु हंगामात तेंदु खरेदी-विक्री प्रक्रिया स्वतः पार पाडली. यात त्यांनी प्रस्थापित ठेकेदारांना बाजूला ठेवून स्वतः खरेदी केली. त्यामुळे ठेकेदारी जगतामध्ये मोठी दहशत निर्माण झाली. 
     तसेच भामरागड़ तालुक्यातील (परिसरातील) जनतेने देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात पायंड रचत २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी जनतेचे प्रतिनिधी उभे करून त्यांना बहुमताने कौल दिला. त्याचीच परिणिती म्हणजे आज भामरागड़ तालुक्यात जनतेचे सरकार आहे. हे सर्व इलाक्यातील ग्रामसभा संघटीत असल्यामुळे शक्य झाले. तरी आज इलाक्यातील ग्रामसभांपुढे अनेक अव्हाने आहेत. म्हणून भामरागड़ पट्टीतील सर्व ग्रामसभांनी बाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपारिक संमेलनाचे आयोजन करून या संमेलनामध्ये या विषयी व्यापक चर्चा सत्र ठेवले आहे. आपण या संमेलनात सहभागी होऊन बाबलाई मातेचे दर्शन घ्यावे व व्यापक चर्चा चर्चासत्रात भाग घ्यावे म्हणून सदर आयोजन समितीच्या वतीने सर्व जनतेला सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur