Today : 14:08:2020


खड्डे बुजविण्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट (चोकशी करुन कारवाई करा) युवा सेनेची मागणी

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :- 
महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याचा दृष्ठीने इतर शहरांसह गडचांदूर ते पाटण, शेणगाव, जिवती या रस्त्या वरिल खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. माञ या ठिकानी सुरू असलेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ठ असल्याची ओरड नागरिक करित आहे. याकडे सा.बा.विभाग अभियंत्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे आरोप करत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर कामांची पाहणी करुन संबंधित विभाग अभियंता व कंञाटदारावर कारवाई करावी, अन्यथा शिनसेना स्टाईलने आंदोलन ऊभारण्याचा इशारा जिवती तालुका युवासेना प्रमुख नजीर शेख यांनी दिला आहे.
     तसेच वास्तविक पाहता खड्डे बुजविण्याचे काम ज्या पद्धतिने व्हायला पाहिजे तसे होताना दिसत नाही. या कामाचा निव्वळ देखावा करुन सर्रासपणे शासनाच्या डोळ्यात धुळफेक केली जात असून अत्यंत निकृष्ट दर्जेचे मटेरिअल खड्डे बुजविण्यासाठी वापरले जात आहे. ही बाब सर्वसाधारन नागरिकांच्या लक्षात येत आहे. परंतु संबंधित विभाग अभियंत्या कडुन दुर्लक्षीत होने, हे कितपत योग्य असून या विषयी आश्चर्यसह अनेक शंका-कुशंकांना पेव फुटले आहे. जिवती, कोरपना तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते खड्डे बुजविण्याच्या कामांची पाहणी करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाल्याचे बोललेजात असून वरिष्ठांनी सदर कामासह गडचांदुर ते जिवती येथील कामांची चौकशी व दर्जा तपासावा व दोषी आढळल्यास अभियंता व कंञाटदारावर निष्पक्ष कारवाई करावी अशी मागणी शेख यांनी तहसीलदार जिवती यांच्यासह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी राजुरा, मुख्याधिकारी जि.प.व मुख्यअभियंता चंद्रपुर यांना दिलेल्या निवेदना द्वारा केली आहे. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अत