Today : 14:08:2020


रिसोड आगारातून रातराणी गाड्या सुरू करण्याची भाजपाची मागणी.. एस.टी प्रशासनाचा थंड प्रतिसाद

विदर्भ टाईम्स न्युज / वाशीम  
रिसोड, महेंद्रकुमार महाजन :- 
रिसोड आगारातून पुणे, नागपूर, पंढरपूर इत्यादी लांब पल्ल्याच्या ठिकाणी रातराणी गाड्या सुरू करण्याची मागणी भाजपाच्या वतीने दि. २७ डिसेंबरला करण्यात आली. रिसोड हे व्यापारी दृष्टीने महत्वाचे ठिकाण असून व्यापरिक दृष्टीने पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी तर धर्मीक वृत्तीचे असंख्य नागरिक पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूर ला जात असतात याठिकाणी रात्रीची गाडी नसल्याने अधिकचा वेळ तर जातोच परंतु  प्रवाश्यांची गैरसोयसुद्धा होते. नागरिकांच्या भावना आगार व्यवस्थापका पर्यंत पोहचविणारे व गाड्या सुरू करण्याचे निवेदन भाजपा शहराध्यक्ष दिपक सोनुने यांच्या नेतृत्वात बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आगार प्रमुखांना देण्यात आले.
     सदर ची मागणी सातत्याने होत आहे परंतु तुम्ही करा वटवट आम्ही मात्र निब्बरघट अशी परिस्थिती मागणी कारणारांची झाली आहे. आगार व्यवस्थापक केवळ आश्वासनाचा नारळ  देऊन  मागणि कर्त्यांना परत पाठवितात. मागणीचा कोणत्याही प्रकारे पाठपुरावा केला जात नाही. तसेच बस स्थानकातील अस्वच्छता तर कायम शहराच्या स्वच्छता अभियानाला कलंकित करीत आहे. अनेक समाजसेवेचे आंबटशौकीन एक दिवस साफसफाई करून फोटो काढण्या पालिकडे स्थानकाच्या स्वच्छतेशी संबंध ठेवत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
     भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या निवेदनाची तरी दखल घेतली जाईल व रातराणी गाड्या व स्वच्छ बस स्थानक परिसर होईल अशी अपेक्षा आहे.सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विविध कारणाने बस फेऱ्या  रद्द केल्या जातात हा प्रकार बंद करण्याची ताकीद सुद्धा निवेदनात दिली आहे. निवेदन देतांना शहराध्यक्ष दिपक सोनुने सह शहर उपाध्यक्ष गजानन फुके, शहर सरचिटणीस श्रीकांत संत, सरचिटणीस सुनील धुत, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सुरज भाई, व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष सतिशजी दलाल, सुनील खके, गजानन साबळे, भीमा माळेकर, श्रीनिवास तोतला, जयंत वसमतकर, बंडू सरोदे, कुणाल जुमडे, गोपाल गरकळ, राहुल जुमडे, गोविंद भुसारी, रोशन वाघ, ओंकार अण्णा मिटकरी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Washim | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01