Today : 14:08:2020


थर्टी फस्ट पथ्यावर अवैद्य दारुपुरवठा होण्याची शक्यता (सिंदेवाही पोलीस सज्ज असंण्याची गरज)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार  :-
जिल्हयात दारूबंदी असूनही राजरोसपणे अवैद्य दारू विक्री होत आहे. अनेकावर कित्येकदा कारवाई होवूनही अवैद्य दारू व्यवसाय सोडतांना दिसत नसल्याचे बोलले जाते. तर काही व्यक्ती अवैद्य दारूव्यवसाय करीत असून त्यांचेवर कारवाई होत नसल्याने शंका निर्माण केली जाते. सिंदेवाही तालुक्यात अवैद्य  दारू व्यवसायाने कहर केला असून फोन करा जिथ पाहीजे, तिथ मिळवा ऑन-लाईन व्यवसायाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. " फोन करा, घरपोच दारू मिळवा "  ही म्हण तयार व्हायला वेळ लागणार असे चर्चिले जात आहे.
     तसेच आठ दिवसा अगोदर देलनवाडी गावात चंद्रपूर एल.सी.बी. पथकाने धाड टाकून लाखों रुपयाची दारू हस्तगत केली. मात्र जालंधर नामक फरार आरोपीला पकडण्यास सिंदेवाही पोलीसांना अजूनही यश आले नाही. त्यामुळे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. आरोपी जमीनसाठी प्रयत्न करित असेल तर त्याची वाट बघायची काय ? असा प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे.
     अवैध दारू व्यवसायात तरूण पिढी गुरफटली जात असल्याने आपल्या जिवनाचे वाटोळे करायला निघालेल्या तरुणाकडून काय अपेक्षा करायचे असे म्हटले जाते. एका काळात सायकलने फिरणारे दोन वर्षाच्या काळात दुचाकी, चारचाकी ने फिरतांना दिसत असल्याने अवैद्य दारू विक्रीच्या धंदयाबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते. तर दारू पिणारा व्यसनात व्यसनाधिन होत असल्याने ज्यादा पैसे देवून दारू घ्यावी लागत असल्याने सायकल ही गहाण ठेवून व्यसन पुर्ण करण्याची पाळी तळीरामावर आली आहे.
     नवीन वर्षाची चाहुल सर्विकडे लागली आहे. येत्या काही दिवसात हड्डी आणि मड्डी वर ताव मारून थर्टीफस्ट चा दिवस साजरा करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र जिल्हयात दारू बंदीचे ग्रहण तळीरामाच्या मते लागले असल्याने त्यांचे त्या दिवसाचे वांदे झाले असे म्हटले जाते. कोणत्याही परिस्थितीत थर्टीफस्ट दिवस साजरे करून आनंदाचा उच्छांद करण्यासाठी दारूचा डोज घेवून नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या रात्री मनमौज करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मोठया प्रमाणात अवैद्य दारू पुरवठा होवून अवैध दारूविक्री होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्क राहून अवैद्य दारू पुरवठा व अवैध दारू विक्रीवर आळा घालावा. अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-29


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli