Today : 18:10:2019


पात्र कत्रांटदाराला डावलून अपात्र कंत्राटदाराला निविदा मंजूर (न्यायालयातुन निविदेला आणली स्थागिती : पत्रकार परिषदेत ग्रा.पं. सदस्यनी दिली माहिती)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सिंदेवाही, अमर बुद्धारपवार :- 
ग्रामपंचायत कार्यालय नवरगाव कडून साहित्य पुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आले, यामध्ये सहा कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या त्यामधील दोन निविदा त्रुटीमुळे नाकारण्यात (नियमबाह्य) आल्या मात्र नाकारलेल्या व्यक्तीलाच पुन्हा साहित्य पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच विकास कामास पारदर्शकता यावी यासाठी शासनाने ई निविदा प्रक्रिया सुरु केली असून नवरगाव  ग्रामपंचायतीने ई निविदा मागीतल्या त्यामध्ये मुकेश मार्केटिंग, महेंद्र ट्रेडिंग, मयूर बोडने, अनिल बोरकर, अण्णाजी बिल्डिंग व सुशांत बोडने यांनी निविदा सादर केल्या होत्या. 
     तसेच ग्रामपंचायत कडून ३ नोव्हेंबर २०१७ ला उघडण्यात आल्या . यामध्ये मुकेश मार्केटिंग यांनी रजिस्ट्रेशन कॉपी जोडलेली नव्हती तर सुशांत बोडणे यांचे     जि.एस.टी. व इन्कमटॅक्स बाबतीचे दस्तऐवज पाहण्यात आले नसल्याने दोघांना निविदेतून बाद करण्यात आल्याची बाब त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.  यामध्ये अतिरिक्त चार कंत्राटदाराकडून ज्यांचे दर कमी असलेल्या कंत्राटदारांना निविदा मंजूर व्हायला पाहिजे होती. यामध्ये एल 1  प्रमाणे सर्वात कमी दर असलेल्या महिंद्रा ट्रेडींगला काम मिळाला पाहिजे होते. मात्र ग्रामपंचायत स्तरावरून त्यांना वगळून ज्यांची निविदा फेटाळली होती अशा  व्यक्तीला नियमबाह्य करण्यात आली होती. अशा व्यक्तीची पुन्हा निविदा कशी मंजूर झाली ? असा प्रश्न पत्रकार परिषदे मध्ये ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम ठाकरे आणि महेंद्र ट्रेडिंगचे मालक महेंद्र कामडी यांनी उपस्थित केला. 
     तसेच याबद्दल महेंद्र कामडी यांनी संवर्ग विकास अधिकारी पस सिंदेवाही यांच्याकडे १० नोव्हेंबर २०१७ ला लेखी तक्रार केली असून याबरोबरच जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर, अध्यक्ष जि.प., आ.किर्तीकुमार भांगडिया यांच्याकडे तक्रारी केल्या परंतु या बाबत कुठलीही चौकशी न झाल्याने शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता या निविदेवर न्यायालयाचा स्टे (स्थगिती) मिळाल्याचे सांगितले तसेच अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून निर्णय काय लागतो याकडे नवरगाव वासियांचे लक्ष लागलेले आहे. ग्रामपंचायत च्या ढिसाळ कारभारामुळे गावाच्या विकासाची गती मंदावत चालली आहे असा ही आरोप त्यांनी केला. त्यावेळी पत्रकार परिषदेला ग्रापं सदस्य पुरुषोत्तम ठाकरे व महेंद्र कामडी उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli












































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli