Today : 08:08:2020


वरोरा मध्ये गाव निहाय सूक्ष्म नियोजन कार्यशाळा

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
वरोरा, अतुल कोल्हे :- 
वरोरा गाव निहाय सूक्ष्म नियोजन प्रक्रियेच्या कार्यशाळेचे आयोजन वरोरा तालुक्यातील टेमुर्डा गावात नुकतेच करण्यात आले. तसेच टाटा ट्रस्ट मुंबई आणि जिल्हा प्रशासन चंद्रपूर व जनसेवा ग्रामीण विकास, शिक्षण प्रतिष्टान यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये डेटा कलेक्शन व मायक्रोप्लानिंग प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर प्रक्रिया वरोरा तालुक्यात राबविण्याच्या दृष्टिकोनातून टेमुर्डा येथील ग्राम पंचायत भवनात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
     या कार्यशाळेचे उदघाटन आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, जिल्हा परिषद सदस्या सुगंधा जिवतोडे, पंचायत समिती सदस्य नारायण कोरकार, वंदना दाते, संवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, टाटा ट्रस्ट चे संदीप पाटील, नायब तहसिलदार कोवे प्रामुख्याने उपस्थित होते.
     तसेच कार्यक्रमाचे संचालन टाटा ट्रस्टचे वरोरा तालुक्यातील समन्वयक रवींद्र मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार सविता झाडे यांनी मानले. कार्यक्रमाला वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत सचिव, मंडळ अधिकारी, तलाठी सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli