Today : 04:08:2020


चिमूर येथे ऑगस्ट २०१८ पूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्याचे प्रयत्न – आ. किर्तीकुमार भांगडिया

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :- 
चिमूर क्रांती जिल्हयाची मागणी पुर्णत्वास येणार असून या दिशेने एक पाउल पुढे पडले आहे. चिमूर येथे ऑगस्ट २०१८ पूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी दिली. ते चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सव कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपकजी यावले, भाजपचे जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीपजी शिवरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही.अंथोनी, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एम.बी.पिसे, संथेचे कार्यवाह सहसचिव एन.डी.कामडी, संथेचे सदस्य जनार्दन चौधरी, गोहणे गुरुजी, अनिरुद्धसिंग राजपूत, प्रा.आबाजी मेश्राम, प्रा.राउत, प्रा. बनसोड, गजभिये, वरभे आदि उपस्थित होते. 
     तसेच आ किर्तीकुमार या प्रसंगी पुढे म्हणाले कि, चिमूर जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. चिमूर जिल्हा होईलच परंतु याहीपुढे चिमुरला न्यायचे असून आपण असो व नसो चिमूर येथे २०२२ पर्यंत रेल्वे येईलच. चिमूरच्या सभोवतालचे सर्व मार्ग राष्ट्रीय महामार्ग केले असून अनेक मार्गांचे काम सुरु झाले आहे तर काहींचे डि.पी.आर.चे टेंडर निघाले आहे. त्यांनी सांगितले कि, जग खूप पुढे चालले आहे, आपण फार मागे आहोत, याला कारण आजचे पुढारी आहेत, पुढारी आपल्या स्वार्थासाठी युवकांचा वापर करून घेतात त्यामुळे युवकांनी जागृत होण्याची गरज आहे. पक्ष वा विचारसरणी वेगवेगळी असो परंतु कोण काम करून देऊ शकतो, कोणाकडून काम करून घेऊ शकतो अशा पुढा-यांच्या  पाठीमागे युवकांनी उभे राहणे हि काळाची गरज आहे. अपयशाच्या मागेच यश असते, शिक्षकांचे खरे मार्गदर्शन मिळाले तर कोणताही विद्यार्थी अयशस्वी होत नाही. २०२२ पर्यंत जगात सर्वात तरुण देश म्हणून जर कोणत्या देशाची ओळख होणार असेल तर तो भारत देश आहे. 
     भारत देशाला विश्वगुरु बनविण्याची जबाबदारी हि तुमच्या आमच्या खांद्यावर आहे. यासाठी आपल्या सर्वांनी जागृत व्हायचे आहे.चिमूर करांसाठी आनंदाची बातमी आहे,चिमूर स्टेडीयम येथे व्हीसीएच्या माध्यमाने क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रयत्न सर्वतोपरी आहे. आमच्या तालुक्यातून एखादा आय.ए.एस. कलेक्टर झाला पाहिजे,एसपी झाला पाहिजे, कपिल देव, सचिन तेंडूलकर झाला पाहिजे यासाठी आम्हाला जे काही करायचे आहे ते करायचा प्रयत्न  आम्ही करतोय. आपण सर्वांच्या सहकार्याने या क्षेत्राची सेवा करायची संधी मिळाली, यासाठी मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-30


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur