Today : 14:08:2020


कृउबा समीती उप बाजारपेठ नवरगाव येथील वे ब्रिज बांधकामाची सखोल चौकशी करा:-संचालक राहुल पोरेड्डीवार यांची मागणी

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
  सिंदेवाही कृषी  उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उप बाजार पेठ नवरगाव येथे वे ब्रिज चे बांधकाम सुरू असून त्या बांधकामाची अंदाज पत्रकीय १३ लक्ष ७० हजार १०० रुपये असून त्या बांधकाम मध्ये वे ब्रिज व कॉम्प्युटर रूम असे एकूण अंदाजपत्रके मध्ये तरतूद करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षदर्शी मासिक सभेत वे ब्रिज संदर्भात माहिती मागितली असता  सभापती व सचिव यांनी नोव्हेंबर मधील झालेल्या मासिक सभे पासून कोणतीही माहिती आजपर्यंत दिलेली नाही. यावरून असे दिसून येते कि, त्यांनी सुप्टेंबर महिन्याचे मासिक सभेमध्ये अंदाजे ९ लक्ष ७५ हजार रुपये ची रक्कम दिल्याची वाचन सभेमध्ये करण्यात आले परंतु त्यांना मोजमाप पुस्तिका मागितली असता ते आजपावेतो अर्ज करून सुद्धा अंदाजपत्रक व मोजमाप पुस्तिकेचे छायांकित प्रत अजूनही दिलेली नाही. यावरून वे ब्रिज मध्ये अंदाजकीय पत्रकानुसार किती टनाचे व कोणत्या कंपनी चे वे ब्रिज लावण्यात आले हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
     तसेच यावरून बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल पोरेड्डीवार यांनी आरोप करित या बाबतची तक्रार निवेदनाद्वारे जिल्हा उपनिबंधक अधिकारी चंद्रपूर यांना देवून प्रतिलिपी विभागीय सह निबंधक नागपूर, सह व्यवस्थापक बाजार समिती सहकारी संघ पुणे यांचेकडे पाठवून सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली  आहे.
     सबंधित तक्रारी बाबत कृउबास. प्र. सचिव श्रीकृष्ण बोरकर यांना विचारणा केली असता विदर्थ टाईम सोबत बोलतांना सांगितले की, नवरगाव बाजारपेठ  वे ब्रीज बांधकाम व अन्य खरेदी प्रक्रिया ही शासकीय नियमानुसार ई- टेंडरींग द्वारे करण्यात आले.असून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. तसेच संचालक पोरेड्डीवार यांना बांधकामाची माहीती देण्यात आली होती असे त्यांचे म्हणणे आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
 नवरगाव पासून एक किलोमिटर अंतरावरील धुमनखेडा गावात सोमवार सायंकाळ सात वाजताच्य..