Today : 04:08:2020


आदिवासीचे प्रतिक सल्ला गंगारा प्रतिष्ठापनाचे आयोजन (आदिवासी समाज हे निसर्गपूजक असून या निसर्गचे आधिन रक्षक आहे : भास्कर तलांडे प.स.सदस्य अहेरी)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
प्रतिनिधी कमलापूर :-
आदिवासी  निसर्ग पूजक समाज आहे. दिनांक २७ डिसेंबर २०१७ ते २९ डिसेंबर २०१७ असे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन कमलापूर गावापासून अतिसंवेदशिल डोंगराळ व घनदाट जंगलात वसलेल्या अतिदुर्गम असे मौजा "आसा" या गावात आयोजन करण्यात आली आहे. तसेच पहिला व दुसरा दिवस व्हॅलीबाल सामने घेण्यात आले तर तिसरा दिवस आदिवासी चे प्रतिक सल्ला गंगारा प्रतिष्ठापना व  समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे होते तर अध्यक्ष म्हणून कमलापूर ग्राम पंचायतीचे सरपंच, रजनीता मडावी होत्या. तसेच प्रमुख पाहूने म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक, लचा आत्रम, कोरके कूड़ामेथे, नोगो गावडे, भूमका मल्लाया साकटव  मेश्राम होते. 
     सर्व प्रथम गोंगा पूजा करून, सप्तरंगी झेंडयाचे ध्वजरोहण कार्यक्रमचे उदघाटक भास्कर तलांडे यांचाहस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना भास्कर तलांडे म्हणाले कि, आदिवासी समाज हे निसर्गपूजक समाज असून या निसर्गचे आधीन काळापासून सतत रक्षण करत आहे. मात्र पूँजीवाद लोकांकडून सतत अन्याय सहन करवा लागत आहे. वनअधिकर व पेसा कायदा अंतर्गत सर्व अधिकार ग्रामसभेला देण्यात आले असल्याने जल, जंगल, जमिन चे संगोपन व संवर्धन करणे आज काळाची गरज आहे.
     तसेच या कार्यक्रमाचे संचलन व प्रस्ताविकेतून सत्यनारायण कोडापे यांनी समाज शिक्षणापासून आजही दूर आहे. सर्वानी ऊतम असे शिक्षण घेवुन स्वतःची व  समाजची विकास व सेवा करावी व समाज कार्यासाठी अग्रेसर रहावी असे मार्गदर्शन केले. या सल्ला गंगारा कार्यक्रमाला परिसरातील आसा, न्यनेर, कवटाराम, कांपवेंच, गुडीगुड्डम आदी गावातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli