Today : 08:08:2020


३ लाख ५० हजार रुपयांचा मोहा सडवा जप्त.. आरोपी झाले फरार.. ठाणेदार दिनेश लबडे यांनी केली कारवाई

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :- 
कमी मेहनतीत जास्त पैसा कमाविण्याच्या नादात युवा पिढी गुरफटली जात आहे. कारवाई होवूनही पुन्हा त्याच धंदयात स्वतःला ओढून घेत आहेत. अवैद्य दारूविक्रेते ३१ डिसेंबर वर्ष समाप्ती दिवस व नवीन वर्ष १ जानेवारीचे आगमना निमित्य उत्साहात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चिमूर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार दिनेश लबडे यानी आपल्या कर्तव्यदक्षतेने सापडा रचून बोरगाव जंगलात मोहाची दारू काढून विक्री करणाऱ्याचे ५० ड्रम मोहा सडवा ची किंमत ३ लाख रुपये तर दुसरा आरोपीचे १२ बँरल मोहादारू किंमत ५० हजार रुपये असे एकूण ३ लाख ५० हजार रुपयांची मुद्देमालासह एका आरोपीस अटक करण्यात आली तर दोघे फरार झाले या कारवाईने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
     बोरगाव जंगल शिवारात मोहफुलांची दारू काढून अवैध व्यवसाय सुरु होता याची चाहूल ठाणेदार दिनेश लबडे यांना लागताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बोरगाव जंगल गाठले परंतु त्या नियोजित जागेचा पत्ता लागत नव्हता दारूविक्रेत्यांनी आपल्या अकलेचा वापर करीत ५० ड्रम व ४० पिपे हे जमिनीत पुरून ठेवून वरून कचरा पाला पाचोळा झाकुंन ठेवला त्यामुळे ती जागा दिसत नव्हती अखेर त्या जागेचा तपास शोध घेत ती नियोजित जागा सापडली खोदून ५० काढून ड्रम व ४० पिपे मधील मोह सडवा काढण्यात आला एकूण किंमत ३ लाख रुपयांची असून या कारवाईत संजय वरखेडे व इतर वर गुन्हा ६५  ई मुदका गुन्हा नोंदविण्यात आला आरोपी  फरार झाले असून ही कारवाई ३० डिसेंबर ची आहे. तर दि २९ डिसेंबरच्या कारवाईत केसलापूर येथील अजय गुलाब मोहिणकर याचा १२ बँरल मोहा दारू पकडली असून किंमत ५० हजार रुपयांची असून अजय मोहिणकर वर ६५  ई मुदाका नुसार कारवाई करून अटक करण्यात आली.
     दोन दिवसांच्या मोह दारू व सडवा कारवाईत एकूण ३ लाख ५० हजार रुपयांची पकडून कारवाई केल्याने ३१ डिसेंबरच्या उत्साहित कार्यक्रमावर विरंजन पडले असून दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच दोन दिवसासाठी १४ अट्टल दारू विक्रेत्यांना चिमूर शहरबंदी ३१ डिसेंबर समाप्ती वर्ष  व  १ जानेवारी नवीन वर्ष आगमन निमित्य युवा वर्ग उत्साह साजरा करीत असतात परंतु दारू पिऊन काही अनुचित घटना घडत असतात यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी शहरातील काही अटल दारू विक्रेत्यांचा अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे पाठविला असता त्यांनी ३१ डिसेंबर व १जानेवारी या दोन दिवसासाठी चिमूर शहर बंदी करण्यात आली त्यात सुनिल बोरकर, खटू नागपुरे, सुनिल उईके, अमर अंबादे, वनिता मोहिणकर, संजय वरखेडे, संजय साठोने, विजय बावनकर, प्रवीण नवले, मिथुन राऊत, समीर लंगडा, गुरुदास सोनवणे, रुखमाबाई सोनवणे, रवी बावनकर यांना चिमूर शहरबंदी करण्यात आली अशी माहिती ठाणेदार दिनेश लबडे यांनी दिली या कारवाईने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू

2018-01-08 | News | Chandrapur