Today : 04:08:2020


युवकांनी गुरुदेवांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प घ्यावा – आ. बंटी भांगडिया

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :- 
युवकांनी गुरुदेवांचे विचार घरोघरी पोहचविण्याचा संकल्प करावा असे आवाहन चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी केले गुरुदेव सेवा मंडळ तुकूम तर्फे आज आयोजीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला संबोधित करीत होते. याप्रसंगी गोरवे महाराज, जेष्ट भाजपा नेते वासंतभाऊ वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष डॉ.दिलीपजी शिवरकर, सुनील शेडामे, प्रमोद बोरकुटे, भाऊरावजी खिराटकर, नारायणजी निखाडे, मनीष तुमपल्लीवार, प्रा. खंगार सर, प्रवीणजी गणोरकर आदि प्रमुख्याने उपस्थित होते.
     तसेच आ.किर्तीकुमार भांगडिया यांनी पुढे सांगितले कि, आपण भाग्यशाली लोक आहोत, तपोभूमिच्या जवळ आहोत. तपोभूमी दर्शन घ्यायला दूरदुरून लोक येतात, मात्र तपोभूमिचे जवळ असूनही राष्ट्रसंतांच्या विचारावर आपण किती चालतोय, याचा विचार सर्वांनी करायला हवा. तपोभूमीचा विकास करणारा मी कोणीच नाही, ज्या दिवशी राष्ट्रसंतांचा आदेश होणार त्या दिवशी या तपोभूमिचे वृंदावन होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. मी केवळ निमित्तमात्र आहे. गेल्या जन्मीचे पुण्य असेल, त्यामुळे माझा या क्रांतीभूमीत, तपोभूमीत जन्म झाला आणि राष्ट्रसंताचे कार्य मला करायला मिळाले. राष्ट्रसंतानी संधी दिली मी माझे जीवन सफल झाले असे मी समजतो. राष्ट्रसंतांच्या विचारावर चालायचा प्रयत्न मी करतोय. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहो इतकी ताकत ग्रामगीतेमध्ये आहे. आपण त्या ताकतीचा वापर करत नाही दु:ख इतकेच आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli