Today : 04:08:2020


चिमूर भाजप महिला मोर्चा बैठक संपन्न (भाजप महिलांच्या पाठीशी :- वनिता कानडे)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :- 
भाजप कार्यकर्ता हा तन मन धनाने काम करीत असल्याने पक्ष मजबूत होऊन आज केंद्र व राज्यात सत्तेवर आहे केंद्रीय राज्य गृहमंत्री पदाची धुरा खासदार हंसराज अहिर व  नामदार सुधीर मुनगटीवार अर्थमंत्री असताना महिला वर्गानी घाबरण्याचे कारण नसून भाजप चे सरकार हे महिलाच्या विकासासाठी विविध योजना राबवित असून सरकार हे महिलांच्या पाठीशी असल्याचे भाजप महिला मोर्चा प्रदेश सदस्य  वनिता कानडे यांनी सांगितले. 
     चिमूर येथील आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या निवासस्थानी झालेल्या महिला बैठकीत वनिता कानडे बोलत होत्या यावेळी महिला भाजप जिल्हा अध्यक्ष रेणुका दुधे ,वदना अगरकाटे, कल्याणी तेलंग , संध्या मिश्रा, नगराध्यक्ष शिल्पा राचलवार जिल्हा सचिव गीता लिंगायत उपस्थित होत्या. तसेच  वनिता कानडे पुढे म्हणाल्या की दारू बंदी हि समाज व महिला हितासाठी नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली असली तरी विरोधकांनी जीवाचे रान केले तरी जनता मात्र भाजप चे सोबत च असल्याचे सांगत येत्या ३ जानेवारीला सावित्री बाई फुले जयंती निमित्य भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी मेसेज फलक लावण्याचे सांगितले आणि भाजपचे विचार व आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे विकास कामे हे जनते पर्यत पोहचविण्याचे काम करण्याचे सांगितले. 
     यावेळी माधवी नाईक, जिप. सदस्य रेखा कारेकर, स्थायी समिती सभापती छाया कंचर्लावार, नगरसेवक भारती गोडे, हेमलता नन्नावरे, उषा हिवरकर, जयश्री निवटे माजी जि.प. सदस्य पार्वता गभने, वर्षा शेंडे, पायल कापसे आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या संचालन ज्योती ठाकरे तर आभार माया नन्नावरे यांनी व्यक्त केले. यावेळी सोशल मिडिया जिल्हा संयोजक अमोल कोंडबंतूनवार यांचे अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघाटे :-
  मुलचेरा येथील स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे आज दिनांक ०९ जा..