Today : 04:08:2020


आपल्याला घडविण्याची शक्ती केवळ राष्ट्रसंतांनी दिलेल्या ग्रामगीतेत आहे - आ. बंटीभाऊ भांगडिया

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
चिमूर, फिरोज पठाण :-
  राष्ट्रसंतांच्या विचारात इतकी ताकत आहे कि, स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार आपण स्वत:च होऊ शकतो दुसरा कोणीही आपणास घडवून देऊ शकत नाही. असे किती येणार नि जाणार त्यांची ताकत नाही कि आपल्याला घडवून देणार, घडविण्याची ताकत केवळ राष्ट्रसंतानी दिलेल्या ग्रामगीतेत आहे. असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी केले. ते अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अडेगाव (देश) तर्फे आज आयोजीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी तथा हनुमान जयंती महोत्सवाला संबोधित करीत होते. याप्रसंगी राम राऊत, जेष्ट भाजपा नेते वसंत वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, ह.भ.प. इखार महाराज, वैद्य काका, राजूभाऊ देवतळे, सरपंच संजयजी चौधरी,  मनीष तुमपल्लीवार, प्रविण गणोरकर, हरिचंद्र चौधरी आदि प्रमुख्याने उपस्थित होते.
     तसेच त्यांनी पुढे सांगितले कि, ग्रामगीतेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कधीही अपयश येणार नाही. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेवर आपण चालत नाही याची खंत वाटते. गुरुदेव भक्तांना पुढा-यापुढे काही मागायची गरज नाही, राष्ट्रसंतांची ज्या दिवशी इच्छा झाली त्या दिवशी या तपोभूमीचा विकास कोणीही रोखू शकणार नाही. राष्टसंताचा आदेश झाला त्या दिवशी ८०० हेक्टर जमीन वन खात्याकडून सोडवून आणण्यात मला यश आले. आदेश झाला त्या दिवशी येथील विकासासाठी निधी आणण्यात यश आले. राष्ट्रसंतांच्या विचारावर चालले तर माझ्या शेतकरी बांधवांना आमच्यासारख्या पुढा-यांची कधीच गरज भासणार नाही. इतकी ताकत राष्ट्रसंतांनी या ग्रामगीतेत देऊन गेले आहे.आपल्याला विश्वास देतो कि, जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे राष्ट्रसंतांच्या मूर्ती देणार. अडेगाव येथील पाणी समस्या सोडविण्यात येईल तसेच येथील सभामंडपाचा प्रश्नही मार्गी लाऊ आणि  प्रत्येक गावात पाणी एटीएम मशीन लावून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli