Today : 15:08:2020


चिमूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षीत : नगराध्यक्ष शिल्पा राचलवार

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
चिमूर, फिरोज पठाण :- 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत सुंदर भारत या नुसार स्वच्छता अभियान राबविण्यासाठी शासकीय, निमशासकीय, लोक प्रतिनिधीसोबत अभियान राबविले जात असून चिमूर नगर परिषद क्षेत्र हे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषद काम करीत असताना स्वच्छयता अभियान मध्ये जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष शिल्पा राचलवार यांनी केले. तसेच स्वछ  महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वछ सर्वेक्षण २०१८  च्या स्वच्छता कार्यक्रमात नगराध्यक्ष शिल्पा राचलवार बोलत होत्या या अभियानात स्थायी समिती सभापती छाया कंचर्लावार, नगरसेवक भारती गोडे, नगरसेवक उषा हिवरकर, नगरसेवक हेमलता नन्नावरे, नगरसेवक उमेश हिंगे व मुख्याधिकारी मनोजकुमार शाह, न.प. चे कर्मचारी हेमंत राहुलवार, मिनाज शेख तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे  विध्यार्थी उपस्थित होते.
     तसेच नगराध्यक्ष शिल्पा राचलवार पुढे म्हणाल्या की चिमूर नगर परिषद हागणदारी मुक्त करण्याचे प्रयत्न सुरु असून ज्यांचे कडे शौचालय नाही अश्याना शौचालयांच्या निधी चा लाभ मिळवून  देण्यासाठी कर्मचारी मार्गदर्शन करतात जवळपास ७५ टक्के शौचालये झाली असल्याने चिमूर शहर हगनदारी मुक्तीकडे वाटचाल करीत असून नाल्या उपसा नियमित नियोजन नुसार होत असून नागरिकांच्या समस्या पुरेपूर सोडविण्यात येत असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की नगर परिषद चे शिल्पकार आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या नेतृत्व व प्रयत्नांनी भरपूर निधी विविध निधी खेचून आणीत असल्याने विकास कामे झंन्झावाताने काही कामे झालीत तर काही कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.
     तसेच स्वछता मोहिमेत हरिसचंद्र डांगे, ताराचंद भुजाडे,शरद पाटील ,सुमित मेश्राम, शुभम गौरकर, विलास चौखे, प्रवीण कारेकर, विनोद मेश्राम आदी न.प.कर्मचारी उपस्थित राहून स्वच्छता अभियानात सहकार्य केले. दरम्यान तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन परिसर येथे साफसफाई करून स्वच्छ करण्यात आली.
News - Chandrapur | Posted : 2017-12-31


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli