Today : 08:08:2020


आमदार आदर्श गाव पिपर्डा येथे स्वच्छता महोत्सव साजरा (विविध कामांचे भुमिपूजन)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
  कोरपना तालुक्यातील पिपर्डा या आमदार आदर्श गावात स्वच्छता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष स्थानी आमदार अॅड. संजय धोटे तर उदघाटन जिल्हा परिषदाचे कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाले.जि.प.चे उप.कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता)रविंद्र मोहिते,सामाजिक कार्यकर्ते सैय्यद आबीद अली इतर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते यावेळी विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. 
     तसेच गावातील लहान मुले उद्याचे भावी नागरिक होणार असून ख~या अर्थाने गावाचा विकास करायचा असेल तर,यांना सर्वांगीन सक्षम केल्यास गावांचा अभुतपुर्व विकास करता येतो.मुलांचा विकास करावयाचा असेल तर स्वच्छतेच्या सवयीसह कुपोषण मुक्त ग्राम होणे गरजेचे आहे.या सोबतच समोर येण्यासाठी तरुणांनी वाचणाची सवय लावावी, व्यसना पासून दुर राहिले पाहिजे, उज्वल जिवन घडविण्यासाठी लहान पणा पासूनच चांगल्या सवयींचा स्विकार केले पाहिजे असे प्रतिपादन जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
     तसेच जिवनमान उंचविण्यासाठी सर्वांनी स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे असून हे सर्व गावांनी ठरविले तरच घडुन येते, हा पिपर्डा ग्रामस्थांनी दाखवुन दिले आहे. गावाची शक्ति सर्वात मोठी असून गावक~यांनी एकत्र येवुन केलेला संकल्प हा पुर्णत्वास जातो असे मत आमदार अॅड.धोटे यांनी या निमित्ताने व्यक्त केले.तर जि.प.उप. मुख्य कार्यकारी अधिकारि रविंद्र मोहितेंसह इतर उपस्थित मान्यवरांनी पिपर्डा गावातील शाश्वत स्वच्छता, गुडमार्निंग पथकासह याठिकाणी राबविले जात असलेले विकास काम व उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.
     कार्यक्रमाला प्रामुख्याने नायब तहसिलदार मडावी,कृषी अधिकारी देवनाडे, स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे,पिपर्डाचे सरपंच चंद्रभान मडावी,धानोलीचे सरपंच विजय रणदिवे,विस्तार अधिकारी जिवन प्रधाण,प्रविण मस्के,खुशाल राठोड,कोरपना नगर पंचायत नगरसेवक सोहेल अली,रमेश पाटिल मालेकर तथा गाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     यावेळी गावातील शाश्वत स्वच्छता राखणारे जेष्ठ नागरिकांचा व गुडमोर्णिंग पथक उपक्रम राबविणा~या तरुणांचा सत्कार करण्यात आला. शादीखाना, सभागृह, प्रधानमंत्री आवास योजनेचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोरपना पं.स.चे सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे, सुत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ता सैय्यद आबिद अली यांनी व्यक्त केले.
News - Chandrapur | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur

"विद्यार्थ्यांचा सत्कार/ संत जगनाडे महाराज फलकाचे अनावरण"
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
जिवनात संघर्ष केल्या शिवाय व जो पर्यंत काटे टोचन..