Today : 15:08:2020


मावळत्या वर्षात तीन वेगवेगळ्या परिसरात अपघातांत ७ जण जखमी

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली  
कुरखेडा, किशोर कराडे :-
दिनांक ३१ डिसेंबर सारा देश मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी संध्याकाळची वाट पाहत असताना आज कुरखेडा तालुक्यात सकाळपासूनच 'थर्टी फर्स्ट' चा असर दिसून आला. तालुक्यात नांन्ही, वडेगाव परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्यात अपघातांत ७ जण जखमी झाले असून, ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींपैकी बहुतांश जण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. तसेच नैयाज हैदर सय्यद (२२) रा.वडेगाव व सिरगल मुजाहिद्दीन शेख (२३) रा. मालेगाव हे मोटारसायकलने कुरखेड्याकडे येत असताना आज सकाळी १०.३० वाजता नान्ही फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात दोघेही जण गंभीर जखमी झाले. दुसरा अपघात दुपारी ४ वाजताच्या सुमारास झाला. सम्यक किशोर गजभिये (१६) प्रतीक देविदास भानारकर (१६) व आकाश खुशाल रामटेके (१६) रा.कुरखेडा हे केशोरी येथून मोटारसायकलने कुरखेड्याकडे येत असताना नान्हीच्या वळणावर अपघात झाला. यात सम्यक गजभियेच्या कानातून रक्तस्त्राव झाला, तर प्रतीक भानारकरचा हात मोडला. हे तिघेही शालेय विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
     तसेच तिसरा अपघात ५ वाजता झाला. कुणाल कार (१८) व मनिष नाकाडे रा.कुरखेडा हेही मोटारसायकलने केशोरीवरुन येत असताना नान्हीजवळच मोटारसायकल घसरुन अपघात झाला. यात ते जखमी झाले. जखमींना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करुन प्रथमोपचार करण्यात आले. गंभीर जखमींना गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपच्या ओबीसी आघाडीचे विभागीय सचिव विलास गावंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे व शिवसेना तालुकाप्रमुख आशिष काळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli