Today : 12:08:2020


अंधश्रद्धेचे भूत मनातून काही जाईना ! (देलनवाडी येथील टेकडीवरील श्री ऋषीदेव मंदीरात बुवा बाजीचा प्रकार सदानंदानी प्रत्यक्षदर्शी अनुभवला)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
मंदिरातले ते दृश्य  "जय शंकरा... जय शंकरा... जय शंकरा" असा जोरात जयघोष करत आंगात देव आलेला बुआ आणि केस मोकळे सोडलेल्या भुतबाधा व आंगात आलेल्या महिला बुआ समोर लोडतांना प्रत्यक्षदर्शी दर्शन अंधश्रद्धेवर नाटयलेखन करणारे नाटककार प्रा.सदानंद बोरकर यांना बघावयास मिळाला असतांना थोडया वेळापर्यत प्रकरण निपटले असून या प्रकरणाची तक्रार कुठे झालेली नाही. अंधश्रद्धेवर प्रबोधन आणि अंधश्रद्धेविरोधात कायदा असतांनाही ग्रामीण भागातले अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर बसले असल्याचे दिसून येत असल्याने अंधश्रद्धेचे भूत मनातून काही जाईना असे म्हणण्याची पाळी आज येत आहे.
     सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी टेकडी वरील श्री ऋषीदेव मंदीरात कार्यक्रमानिमित्य गेलेले श्री ज्ञानेश महाविदयालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनी बघीतलेले दृश्य  पुरोगामी महाराष्ट्रातील बौद्धिक दारिद्र्य व अंधश्रद्धेचे जिवंत उदाहरण म्हणजे सत्तर वर्षातील शैक्षणिक अपयश पदरात पडले असेच म्हणावे लागेल.अशी पाळी काही प्राध्यापकात सोशल मिडीयावर व्यक्त करण्याची पाळी आली आहे. बुवा बाजीच्या या खेळात गाव खेडयातील  लहान मुले, तरुण मुलं, महिला, पुरुष व काही जेष्ठ मंडळी समोर ३० ते ४० लोकं आपले  समस्या, रोगराई, जादुटोणा विषयक संशय घेवून या बुवा कडे सोडायला आल्याचे समजते. 
     मुख्यत्वे सोमवारी देलनवाडीत आपले घरी व सहकारी मंडळी ही कंपनी जोरदार चालवत असल्याचेहीे बोलल्या जाते. मात्र आज नवीन वर्षाच्या पर्वावर ऋषीदेव मंदीरात बुवा बाजीचा प्रकार आणि राष्ट्रीय सेवायोजन कार्यक्रमाच्या समारोपीय भोजन कार्यक्रमानिमित्य उघडकीस आलेला बुवाबाजीचा प्रकार प्रत्यक्ष दर्शीसह प्रत्येकालाच थांबायला पाहिजे असे वाटते पण असा प्रत्यक्षदर्शी प्रकार डोळयादेखत पाहून हा प्रकार कायम स्वरूपी थांबवायला पुढे कोण येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मा.सदानंद बोरकर, प्राचार्य सुरेश बाकरे व सरपंच डोंगरवार व श्री.ज्ञानेश महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तेवढ्या पुरते ऋषीदेव मंदारातील प्रत्यक्षदर्शी बुवा बाजीचे दुकान वेळेपुरती बंद केले. या प्रकाराची काहींनी बघुनही कुठेही तक्रार न केल्याने मात्र बुवाबाजीचे दुकान कायम स्वरुपी चालु राहिल असे बोलले जाते. पुरोगामी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आढळून येणारे अंधश्रद्धा व बुवाबाजीचा प्रकार कायम स्वरूपी केव्हा बंद होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur