Today : 08:08:2020


वनरक्षक - वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करा : नितीन कुमरे

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
आल्लापल्ली, फराझ शेख :-
वनरक्षक - वनपाल यांच्या वेतनवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडली असुन वनरक्षक - वनपाल संघटनेमार्फत वारंवार शासनास वेतनवाढ करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु प्रधान मुख्य वनसंरक्षक (म.रा), नागपूर यांनी त्यांच्या पात्रात वनरक्षक - वनपाल हे यांचे कर्तव्य फक्त ८ तास बजावत असुन कधीकधी ९ ते १० तास बजावत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वनरक्षक - वनपाल यांचे वेतनवाढीत आजपावेतो सुधारणा करण्यात आलेली नाही. 
     दिनांक ३० डिसेंबर २०१७ रोजी वनसंपदा इमारत आल्लापल्ली येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वनविभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामाकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री पडगम कार्यक्रम समन्वयक (रोहयो), जि. प. गडचिरोली व सोनवणे, एम.आय.एस. जिल्हा समन्वयक यांनी उत्तम रित्या रोहयोची कामे कशे करता येईल याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यशाळेंच्या समारोपात मनोगत व्यक्त करतांना श्री नितीन कुमरे (अध्यक्ष वनरक्षक - वनपाल संघटना, आल्लापल्ली वनविभाग) यांनी वनरक्षक - वनपाल हे गेल्या काही वर्षांपासून रोहयो, जलयुक्त शिवार, २ कोटी वृक्ष लागवळ, ४ कोटी वृक्ष लागवळ, एल.पी.जी.गॅस वाटप, वनव्यवस्थापन समिती, रात्रोपाळीचे गस्ती करणे  इत्यादी कामाचा अतिरिक्त बोजा सहन करत आहे. तसेच स्थानिक अधिकारी मात्र वनरक्षक - वनपाल यांचे कर्तव्य २४ तास सेवा देणारे असून ते अमचेकडून करून घेत आहेत. परंतु शासन वनरक्षक - वनपाल हे फक्त ८ तास काम करत असल्याचा दाखला देत वेतनश्रेणीत सुधारण्याचा केलेली नाही. मग वरील कामे हि वनरक्षक - वनपाल यांचे कर्तव्यात नसतांना का करावे ? असा प्रश्न वनरक्षक - वनपाल यांच्या वतीने कार्यशाळेच्या मनोगतात श्री नितीन कुमरे यांनी उपस्थित केला. व वरिष्ठ अधिकारी यांनी शासनाकडे वरील कामे हि वनरक्षक - वनपाल करीत असल्याबाबत ठोस शिफारस करावी असे मत व्यक्त केले. सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री रवी अग्रवाल, उपविभागीय वनअधिकारी, आल्लापल्ली यांनी वनरक्षक वनपाल यांची ही मागणी रास्त असून शासनाकडे याबाबत ठोस पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. विदर्भ टाईम्स न्युज सोबत बोलतांना श्री नितीन कुमरे (अध्यक्ष वनरक्षक - वनपाल संघटना, आल्लापल्ली वनविभाग) यांनी माहिती दिली. 
News - Gadchiroli | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur