Today : 05:06:2020


ग्रामगीतेच्या शिकवणूकीप्रमाणे आचरण करावे : आ.किर्तीकुमार भांगडिया

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :-
  गावात गुरुदेव सेवा मंडळ सोनेगाव (बेगडे) येथे आयोजित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी समारोहाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किर्तीकुमार भांगडिया यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळ सोनेगाव (बेगडे) चे नारायण मानकर, संभाजी मेश्राम, सूर्यभान नन्नावरे, चिमूर नगरपरिषदेच्या नगरसेविका हेमलता नन्नावरे, राजू बोढणे, चिमूर पंचायत समिती सदस्य अजहर शेख, चिमूर नगरपरिषदेचे नगरसेवक सतीश जाधव, भाजप युवा नेते समीर राचलवार, मनीष तुमपल्लीवार, जयगोपाल पिंपळकर, अतुल माहुरे, बळीराम ढोणे, राजेश्वर ढोणे, भास्करजी ढोणे, गुरुदास नन्नावरे प्रामुख्याने उपस्थित होते.
     यावेळी मार्गदर्शन करतांना आमदार किर्तीकुमार भांगडिया म्हणाले कि, प्रत्येकाने ग्रामगीतेच्या शिकवणूकी प्रमाणे आचरण करावे. गावात स्वच्छता राखणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने घराच्या स्वच्छते सारखेच गावाच्या स्वच्छतेकडेही जबाबदारीने लक्ष देणे गरजेचे असून ही जबाबदारी सर्वांनी प्रामाणिकपणे पार पाळावी. चिमूर परिसराच्या विकासाचा ध्यास घेतला असून या परिसराच्या विकासासाठी संसाधनांची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली. यावेळी येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी सदिच्छा भेट देऊन शाळेच्या समस्या जाणून घेतल्या व त्या त्वरित दूर करण्याचे निर्देश दिले.
News - Chandrapur | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प्राणहिता येथे उडान फाउंडेशन, आदर्..