Today : 15:08:2020


सदासर्वदा राष्ट्रसंतांचे विचार स्मरणात ठेवा - आ. बंटीभाऊ भांगडिया

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :- 
दरवर्षी आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी दिवाळी प्रमाणे साजरी करतो, महाराजांचे विचार ऐकतो, परंतु महाराजांचे विचारावर आपण चालत नाही. दोन दिवस पुण्यतिथी साजरी केल्यानंतर आपण विसरून जातो. महाराजांना हे नको होते. त्यांना वर्षभर प्रत्येकाने त्यांचे विचारावर चालायला हवे होते, त्यांचे विचार सदासर्वदा स्मरणात ठेवून त्यावर चालायला हवे होते, असे विचार चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी व्यक्त केले ते श्री गुरुदेव सेवा मंडळ वाघेडा तर्फे आज १ जानेवारीला आयोजीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी समारोहाला संबोधित करीत होते. 
     याप्रसंगी भाजपा चिमूर तालुका ओ.बी.सी.आघाडी अध्यक्ष एकनाथजी थुटे, चिमूर नगरपरिषदेच्या नगरसेविका हेमलता नन्नावरे, चिमूर पंचायत समिती सदस्य अजहर शेख, चिमूर नगरपरिषदेचे  नगरसेवक सतीश जाधव, भाजप युवा नेते समीर राचलवार, मनीष तुमपल्लीवार, भाजपा मासळ - मदनापूर जिल्हा परिषद प्रभारी प्रविण गणोरकर, गुलाब चौधरी आदि प्रमुख्याने उपस्थित होते.
     आमदार किर्तीकुमार भांगडिया पुढे म्हणाले कि, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर आपण कितपत खरे उतरलो आहे याचा विचार आपण कधीही करत नाही. महाराजांचे विचार सर्वांनी पुढे नेले पाहिजे. प्रत्येकाच्या मनात रुजविले पाहिजे. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच होऊ शकतो इतकी शक्ती ग्रामगीतेत आहे. परंतु आपण दोन दिवस पुण्यतिथी साजरी केल्यानंतर जैसे थे होऊन जातो.
News - Chandrapur | Posted : 2018-01-01


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli