Today : 12:08:2020


सिंचन विहीर बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांचे बिल तात्काळ द्या : माजी आमदार आनंदराव गेडाम

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
आरमोरी, दिलीप घोडाम :- 
आरमोरी तालुक्यात शासनाच्या वतीने मे - जून महिन्यात मागेल त्याला विहीर शेतकऱ्यांनी बांधकाम पूर्ण केले परंतु जवळपास सहा महिन्यापासून शेतकऱ्यांची बिल मिळाले नसल्याने शेतकरी अडचणी सापडला असल्याने विहीर बांधकामाचे बिल तात्काळ द्या अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी जिल्हा परिषद " लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता " यांच्याकडे मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी शासनाने मागेल त्याला विहीर मोहीम सुरू करून शेतकऱ्यांना विहिरी मोठ्या प्रमाणात मंजूर केले यात आरमोरी तालुक्यातील पिसेवड्या, दवंडी, परतवाडी येथील शेतकऱ्यांनी मे व जून महिन्यात विहिराचे काम पुर्ण होऊनही उपअभियंता गाजगाटे लघु सिंचन विभाग देसाईगंज यांनी शेतकऱ्यांचे बिल सहा महिने होऊनही काढलेले नाही तसेच शाखा अभियंता यांनी तयार केलेल्या रेकॉर्डवर खोडतोड केल्याची धक्का दायक बाब लाभार्थी वासुदेव जेमठे व पंचायत समिती सभापती नागुजी ताडाम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. 
     तसेच खोडतोड ज्या लाभार्थ्यांना उपअभियंता किंवा शाखा अभियंतेची मर्जी संपादन केले मात्र बिल काढण्यात आलेले नसल्याची तक्रार सिंचन विहिराचे लाभार्थी वासुदेव जेमठे व पंचायत समिती सभापती नागुजी ताडाम यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्याकडे केली याची दखल घेऊन माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी जिल्हा परिषद सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता रामटेके यांच्याशी दूरध्वनी वर संपर्क साधून सदर विहीर बांधकामाचे बिल तात्काळ चौकशी करण्यात यावे व शेतकऱ्यांची अडवणूक करणार्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांच्याकडे केली आहे.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli