Today : 21:09:2020


भिमा कोरेगांव येथे झालेल्या घटनेचा निषेधार्थ मूल बंद

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर  
मूल, दिपक देशपांडे :-
भिमा कोरेगाव मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मूल येथे सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, टपर्या पानठेले बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध मुलमध्ये बंद पाळण्यात येत आहे अत्यावश्यक सर्व सेवा सुरळीत सुरू आहेत. तसेच सविस्तर बाब अशी आहे कि, भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला आणि वढू बुद्रुक येथील गोविंद गायकवाड यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलितांवरील समाजकंटकांकडून करण्यात येत असलेली दगडफेक झाल्याने भिमा कोरेगाव गेलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून जवळपास ४० हून अधिक वाहनांची नासधूस झाली आहे. मागील अनेक वर्षापासून दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी केलेल्या गोविंद गायकवाड यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दलित समाज जातो. मात्र या कालावधीत दलित समाजातील बांधवांवर कधीच हल्ला कोणी केला नाही की त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र डिसेंबर २०१७ मध्ये एका परदेशी प्रसार माध्यमातील वेबसाईटने भिमा कोरेगांवच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पध्दतीने बातमी प्रसिध्द केली. ही बातमी मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पहिल्यांदाच समाजकंटकांकडून दलितांवर दगडफेक करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला.
     काल रात्री पासूनच हजारो लोक आणि तितकीच वाहने क्रांतीस्तंभापासून जवळच असलेल्या पुलालगत पार्क केलेली होती. तर आज सकाळ पासुनच लाखो लोक या ठिकाणी जमा झाले होते. तर काही लोक भगवे झेंडे बाईकवर लावून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. तर काही लोक दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते. तर अचानक दुपारी एकच्या दरम्यान भिमा कोरेगाव जवळच्या पार्किंग भागात दगडफेकीला सुरूवात झाली. इमारतीच्या गच्चीवरून समाजकंटक दगडफेक करून पळून जात होते त्यांना काही महिलाही अटकाव करण्यात पुढे आल्या की ते लोक लपुन पळून जात हीच स्थिती वढू गावातही होती.
     दुपारी सुमारे तीनच्या दरम्यान शिक्रापुर पोलिस ठाण्यात तोडफोड करण्यात आलेल्या वाहनासह तक्रारकर्ते दाखल होवू लागले पोलिस ठाण्यात एक दोन कर्मचारी सोडता मनुष्यबळ कमी होते. वाहनावरील निळे व पंचशील झेंडे पाहून दगडफेक करण्यात येत होती. पाठीमागून दगड मारता हिंम्मत असेल समोर या अशा प्रतिक्रीया तक्रार महिलांनी करीत पोलिस ठाण्याला घेरावच घातला. एकेक तक्रारदार येता येता पोलिस ठाण्यात गर्दी वाढू लागताच पोलिस मनुष्यबळही वाढले. तीन वाजल्यापासून परिसरात भगवे झेंडेधारी यांनी दुकाने हॉटेल्स ढाबे बंद करण्याचे आवाहन करताच धडाधड शटरडाऊन झाले. त्यामुळे सकाळपासून आलेल्या लोकांचे अन्न पाण्यावाचून हाल झाले. परिस्थिती अद्यापही तणावाखाली असून लोक दहशती खाली आहेत. दगडफेक करीत असलेल्यांना पकडायचे सोडून पोलिस लोकांना पांगविण्यासाठी लाठीचा वापर करीत होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..

कार अपघातात डाँक्टर दाम्पत्य थोडक्यात बचावले (बिबट व रानडुक्कर समोर आल्यान

2018-02-04 | News | Gadchiroli