Today : 14:08:2020


पेरमिली कित्तेक वर्षांपासून तालुक्याच्या प्रतीक्षेत (शेतकरी, शाळकरी व अनेक संघटनेची तालुक्यासाठी मागणी)

"शासनाच्या कित्तेक योजना पासून वंचित पेरमिली ग्रामीण"   
विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर :- 
अहेरी जिल्हा घोषित करून पेरमिली गाव हे कित्तेक वर्षांपासून तालुक्याच्या प्रतिक्षेत आहे. पेरमिली तालुका बनविण्यात यावा अशी मागणी पेरमिली परिसरातील ग्रामीण करीत आहे. तसेच अहेरी पासून ४० ते ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेरमिली गावातील ग्रामीण शाळकरी कामे, शासकीय कामे, शेतीविषयक कामे, कार्यालयीन कामकाजासाठी सुद्धा अहेरी मुख्यालयात आपले शेतीची कामे, शाळा सोडून जसे तसे अहेरी मुख्यालयामध्ये येऊन कामे करून घेणे अवघड झाले आहे. तसेच येणाऱ्या नागरिकांचे काम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे ग्रामीण भागातील लोकांचे काम वेळीच होत नाही. त्यांना जाण्याकरिता पूरक व्यवस्था अहेरीतून उपलब्ध नाही. 
     ग्रामीण भागातील लोकांना कार्यालयीन कामकाज संध्याकाळच्या वेळीच होत असतांना, आज होणारे काम उद्या, परवा होणार सांगून त्यांची कामकाजावर अधिकारी/ कर्मचारी कानाडोळा करत असतात यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. सतात दर दिवशी ४० ते ४५ किलोमीटर अंतरावरून येणे - जाणे शेतकरी वर्गाला परवडणारे नसल्याने पेरमिली तहसील लवकरात लवकर निर्माण करावे अशी मागणी गावातील युवक, शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, महिला बचत गट व तसेच अनेक संघटना कडून मागणी कित्तेक वर्षांपासून होत आहे. यातच विशेष बाब म्हणजे पेरमिली परिसर हा नक्षलग्रस्त भाग असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जर शासनाच्या जनतेच्या सोई साठी पेरमिली तालुक्याची निर्मिती करण्यात आली तर ४० ते ४५ किलोमीटर अंतर गाठून जवळच्या जवळ आपले कामे करीत गरीब शेतकरी वर्ग सुखात जाऊ शकतो.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur