Today : 04:08:2020


गोदेडा गुफा यात्रेचे ४९ वे पुण्यतिथी कार्यक्रमात आ.किर्तीकुमार भांगडिया यांचे जनतेला आव्हान (राष्ट्रसंताचे विचार अंगिकरण करा)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
चिमूर, फिरोज पठाण :-
  राष्ट्रसंतांनी गुंफा यात्रेची परंपरा सुरू केली. लाखो लोक दर्शनाला करिता यात्रेला येतात. परंतु येथून गेल्यानंतर लोक राष्ट्रसंताचे विचार स्मरणात ठेवत नाहीत. राष्ट्रसंतांचे विचार स्मरणात ठेऊन अंगिकारण्याची गरज असून आजच संकल्प घ्या असे प्रदिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी गोंदेडा गुंफा यात्रेत केले. चिमूर विधानसभा क्षेत्रातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा गुंफा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजीत गुंफा यात्रा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार मितेशजी भांगडीया, जि.प.अध्यक्ष देवरावजी भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, हभप प्रकाश पंत वाघ महाराज, भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर, चिमूर सहकारी भात गिरणी मुख्य प्रशासक डॉ श्यामजी हटवदे, विवेक कापसे, महाराष्ट्र प्रदेशभाजप अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष जुनेदखान, नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, पंचायत समिती सदस्य अजहर शेख, पुंडलिक मत्ते, पत्रकार संघाचे सचिव गणपत खोबरे, कृ ऊ बा स संचालक कलीम शेख जि प सदस्य गजानन बुटके जि प सदस्य ममता डुकरे, घनश्याम डुकरे, डॉ दिपक यावले, समीर राचलवार, मनीष तुमपल्लीवार, संजय कुंभारे, निलम राचलवार आदी उपस्थित होते.
     आमदार मितेशजी भांगडीया म्हणाले कि, गुरुदेवांची ग्रामगीतेवर समाज, देश चालत असून त्यांचे विचार पुढच्या पिढीसाठी ग्राम गीतेचा वर्ग ५ ते ७ मधील अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्न सुरू असून जि.प. चंद्रपूरने तसा ठराव घ्यावा तपोभूमीचा विकास करीत असताना माध्यमची आवश्यकता असताना गुरुदेवांच्या आशिर्वादाने किर्तीकुमार भांगडीया माध्यम बनून विकास करीत असल्याचे सागीतले जि प अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पुरातन व भौतिक दाखले देत गुरुदेवाचे विचार व आचरण यावर मार्गदर्शन केले.
     गोदेडा गुफा यात्रा समिती च्या ४९ व्या पुण्यतिथी कार्यक्रम दरम्यान विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले यात्रेच्या दिवशी रक्तदान शिबिर मध्ये अनेक गुरुदेव भक्तांनी रक्तदान केले  यात्रेत हजारो गुरुदेव भक्तांनी हजेरी लावली होती जनसागर उफाळला मनोरंजन खेळ, हॉटेल्स, असे विविध दुकाने लावलेली होती. ईश्वर चिट्टीने पुढील कार्यक्रम उत्सव समिती गठीत करण्यात आली त्यात अध्यक्ष विठल सावरकर, उपाध्यक्ष विलास चौधरी, कोषध्यक्ष  नितीन गुरनुले, सदस्य रामदास जांभुळे, कृष्णा जाधव, कविता शेंडे, श्रीराम मेश्राम, बालाजी जांभुळे, उषा गुरनुले, किशोर डांगे, रेवनदास कामडी याची निवड करण्यात आली. हभप. काळे महाराज यांनी गुरुदेव भक्तांना मंत्रमुग्ध केले. गोंदेडा तपोभूमी येथे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन केले. गुंफा यात्रे निमित्य विविध कार्यक्रम आयोजीत स्थळी भेट दिली व गुरुदेव भक्तांना आमदार बंटीभाऊ भांगडीया साहेब स्वतः महाप्रसाद वाटप केलेत व दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा डॉ. हेडगेवार रक्त पेढी नागपूर यांनी रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच गोंदेडा गुफा यात्रेत ठाणेदार दिनेश लबडे यांचे नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
News - Chandrapur | Posted : 2018-01-02


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli