Today : 12:08:2020


शौचालय लाभार्थ्या सोबत संगनमत करुन रक्केची अफरातफर (गडचांदुर न.प.येथील प्रकार/संबंधितावर गुन्हे दाखल करा) संतोष पटकोटवार यांची मागणी

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :- 
स्वच्छ भारत मिशन ही पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना म्हणुन देशभर राबविली जात आहे. देशात स्वच्छता नांदावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागरण करण्यात येत असून प्रत्येक घरी शौचालय असावे, नागरीक स्वच्छ व निरोगी जिवन जगावे यासाठी शासन करोडोंचा निधी सुद्धा खर्च करत आहे. मात्र शासनाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी नवनविन शक्कल लढवुन कशा प्रकारे भ्रष्टाचार करुन या योजनेचा बंटाधार करीत असल्याची गंभीर बाब गडचांदुर शहरात पुढे आली आहे.येथील नगर परिषद अधिकारी,कर्मचारी व शौचालय लाभार्थी यांनी संगनमत करुन स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) च्या शौचालय योजनेच्या रक्कमेची अफरातफर करून शासनाची फसवणुक केल्याचे आरोप करत शहरात बांधण्यात आलेल्या संपुर्ण शौचालयांची वरिष्ठांनी सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्राम पंचायतचे माजी सदस्य संतोष पटकोटवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपुर, यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस, जिल्हा प्रशासक अधिकारी, आमदार अॅड.संजय धोटे यांना सुद्धा माहीती देण्यात आली आहे.
     गडचांदुर शहरात ज्यांच्याकडे स्वत:चे शौचालय नाही अशा १६०० घरांना शौचालयाचे लाभ नगर परिषदेकडुन देण्यात आले. परंतु यात कित्येकांच्या घरी पुर्वी पासुनच पक्के शौचालय बनवुन असताना सुद्धा त्यांच्या नावाने खोटे बिल काढुन शासनाच्या डोळ्यात धुळफेक करुन शासनाच्या निधिची सर्रास अफरातफर करण्यात आली.याची सखोल चौकशी केल्यास सत्यता समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच येथील वार्ड नंबर 6 येथील घर नसलेल्या तथाकथीत रहीवासी माधव मसनाजी वाघमारे, हा व्यक्ती सध्या जिवती तालुक्यातील दमपुर मोहदा येथे वास्तव्यास असताना सुद्धा याच्या नावाने खोटे कागदपत्र तयार करून न.प.आरोग्य विभाग प्रमुख कर्मचारी प्रमोद वाघमारे यांनी संगनमत करुन जुलै,ऑगस्ट २०१७ या दरम्यान बेकायदेशीर पणे नियमबाह्य १२ हजार लाभार्थी माधवच्या बॅक खात्यात जमा केले व शास्कीय रक्कमेची अफरातफर करुन शासनाची फसवणुक केली.
    शासनाच्या नियमा प्रमाणे शौचालय लाभार्थ्याला १७ हजार रूपय अनुदान देण्याची तरतुद आहे.१२ हजार महाराष्ट्र शासन तर ५ हजार न.प. सामान्य फंटातुन दिले जाते. पहेला हप्ता टाकीचे काम झाल्या नंतर,दुसरा हप्ता शौचालय बांधकामा नंतर तर तीसरा हप्ता संपुर्ण काम होऊन शौचालयाच्या वापर सुरू केल्या नंतर टप्प्या-टप्प्याने लाभार्थीच्या बॅक खात्यात रक्कम जमा होते.या सर्व कामाचा वेळो,वेळी छाया चित्र काढुन संबंधित विभागाला देण्यात येते.मात्र याठिकानी अशी कुठलीच प्रक्रीया न करता सदर तदाकथीत लाभार्थ्याच्या खात्यात थेट एक रकमी १२ हजार रुपय जमा करण्यात आले. यात एकाकडे न.प. मुख्याधिकारी यांची भुमिका संश्याच्या फो~यात सापडली तर दुसरीकडे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगर सेवकांचे सुद्वधा याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. वरिष्ठांनी त्वरित या प्रकरणाची चौकशी करुन लाभार्थी व संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावे तसेच शहरातील खरे व खोटे शौचालय लाभार्थी कोण याची चौकशी करावी अशी मागणी पटकोटवार यांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
निकृष्ट बांधकाम पुन्हा उत्कृष्ट करणेसाठी झोपा क़ाढा (ठिय