Today : 08:08:2020


गोंदिया कडकडीत बंद (भिमा कोरेगाव घटनेचा निषेध)

विदर्भ टाईम्स न्युज / गोंदिया 
गोंदिया, अनमोल पटले :- 
सणसवाडी हिंसाचार हाताळण्यास गृह विभागाने कसूर केली असून, पोलिसांनी या प्रकरणात अक्षम्य हेळसांड केल्याचा आरोप भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी करीत या घटनेमागे शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि मांजरीतील घुगे यांचे कारस्थान असल्याचा थेट आरोप केला होता. दरम्यान, डाव्या आणि दलित संघटनांनी आज दिनांक ०३ जानेवारी २०१८ रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला पुरोगामी संघटनांसह मराठा संघटनांनीही प्रतिसाद दिला असून सकाळपासूनच बंदचा परिणाम दिसून येत आहे. 
     गोंदियात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती, बहुजन समाज पक्ष, बीआरएसपी, भारत मुक्ती मोर्चा, काॅग्रेस, राष्ट्रवादी, भाकपसह सर्व पुरोगामी व ओबीसी संघटनांनी बंदला समर्थन दिले आहे. गोंदिया शहरात सकाळपासूनच बंदचा परिणाम जाणवत होता. राज्यपरिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारातून बसेस सोडतांना सुरक्षा विचारात घेऊनच सोडल्या जात होत्या. तर गोंदियातील सर्व शिक्षण संस्था, काॅलेज, महाविद्यलयांनी आधीच सुट्या देत बंदला प्रतिसाद दिला आहे. बाजार पुर्णत बंद असून राज्य परिवहन विभागासह खासगी बसेस आॅटो सर्व बंद ठेवल्याने कडकडीत बंद बघावयास मिळत आहे.
News - Gondia | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli