Today : 14:08:2020


राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
मुलचेरा, गणेश गोरघाटे :- 
आज स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न झाली असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश मेश्राम हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुनंदा पाल व प्रा. डॉ. हिराचंद वेस्कडे यांची विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. पाल यांनी सावित्रीबाईंच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याचे मोल अतुलनीय आहेत, अशा भावना व्यक्त केल्या. सावित्रीबाई म्हणजे अखिल भारतीय समाजातील स्त्रियांच्या मुक्तीमाता आहेत आणि त्याच खऱ्या विद्येची जननी आहेत, असे डॉ. वेस्कडे म्हणाले. प्राचार्य डॉ. मेश्राम यांनी आजच्या युगातील स्त्रियांनी कोणाचा आदर्श ठेवायचा असेल तर सावित्रीबाईंचा ठेवावा, असे मत प्रतिपादन केले.
     या कार्यक्रमाचे संचालन कु. सुष्मिता मंडल हिने केले तर उपस्थितांचे आभार कु. शालू वनकर हिने केले. सदर  कार्यक्रमाप्रसंगी प्रा.अंकुश घरत, डॉ. राजेशकुमार सूर डॉ. हेमंत गजाडीवार, प्रा. अशोक धोटे, डॉ. अरुण लाडे, प्रवीण कुमरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र मत्ते, मनोज कुंभारे, आनंद तावाडे, राजू मडावी, सुरेश मुरमुरवार, मारोती खिरटकर, कविता उईके यांचे  सहकार्य लाभले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प