Today : 08:08:2020


गडचिरोलीत प्रथमच दोन महिन्यात १,७२,५८,८१० रुपयाचा मुद्देमाल जप्त (७ चारचाकी वाहन तर १ दुचाकी वाहन जप्त)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
गडचिरोली प्रतिनिधी :-
आरोपी प्रशांत येडावार हा गडचिरोली जिल्ह्यातील एक कुप्रसिद्ध अवैध दारू विक्रेता असून सदर व्यक्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत विविध कलमाखाली एकूण २० गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये यांच्याकडे आजपर्यंत ३४,०६,४३० रुपयाची दारू व सात वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. स्थागुशा शाखेतील दारूबंदी पथकाच्या धडक कारवाईमुळे प्रशांत येडावार सारख्या अवैध दारू विक्रेत्यांना व्यवसाय करणें अशक्य झाले आहे. दारूबंदी पथकाने केलेल्या कारवाईमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीच्या नैराश्यातुन प्रामाणिक पणे काम करणाऱ्या दारूबंदी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचेवर आरोप केले आहेत.
     प्रशांत येडावार याने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे दाखल अपराध क्रमांक ६८०/२१०७ या अनुषंगाने जे आरोप केले आहेत. यात कोणतेही तथ्य नाही स्थागुशाचे कोणत्याही अधिकारी व कर्मचारी त्याला कधीही भेटलेलं नाही तसेच त्याचे कडून कुठल्याही पैशाची मागणी केली नाही. सदरच्या कार्यवाहीची व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून सदर कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासले आहे. सदर गुन्ह्यातील सहआरोपी विष्णू याला देखील ३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून सदर आरोपीने ही चौकशी दरम्यान आपण प्रशांत येडावार यास ५३ पेट्या दारू विक्री केल्याची कबुली दिली आहे. पोलीस स्टेशन गडचिरोली अपराध क्रमांक ६८०/२०१७ या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रशांत येडावार यास अटक करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
     दारूबंदी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गेले दोन महिन्यांपासून अवैध दारू विक्रेत्या विरोधात धडक मोहीम राबून २३ गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये दोन महिन्यात एकूण १,७२,५८,८१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये ७ चारचाकी वाहन तर १ दुचाकी वाहन जप्त अजुनपर्यंत गडचिरोलीच्या इतिहासात प्रथमच छापा टाकून एकाच वेळी १,२८,०८,८०० रुपयाचा माळ पथकाने जप्त केला त्यामुळे दुखावलेले हितआर्थिक संबंध नैराश्यातुन दारू विक्रेते पोलिसांवर तथ्यहीन आरोप करीत आहेत.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur

चिमुर :- चिमुर तालुक्यातील कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ४९ वी पुण्यतिथी आयोजीत करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्य