Today : 14:08:2020


आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली तर्फे धान खरेदी केंद्रांवर होत आहे निकृष्ठ दर्जाचा बारदाना पुरवठा

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
कुरखेडा, किशोर कराडे :-
म.रा.आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली येथे आधारभूत धान खरेदी योजना अंतर्गत हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातिल ८० ते ९० धान खरेदी केंद्रांमध्ये धान खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या बारदाण्याचे सप्लाय करण्यासाठी ई - टेंडरींग करण्यात आली. यात देसाईगंज येथील एका व्यापाऱ्यास सदर टेंडर देण्यात आले. मात्र सदर व्यापाऱ्याने जिल्ह्यातील सर्वच केंद्रांमध्ये निकृष्ठ दर्जाचे बारदाणा पुरवठा केले असुन यामुळे मात्र सदर विभागाला लाखो रूपयाचा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने धानोरा व कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा, घाटी, आंधळी, कढोली येथे ५० बंडलमध्ये एकही चांगल्या दर्जाचा बारदाणा आढळून आला नाही. हिच परिस्थीती जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर आहे. 
     तसेच बारदाण्याला प्लास्टीकचे तुकडे शिवले असून एकेका बारदाण्याला २ ते ३ छिद्र असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे धानाचा काटा करणे अडचणीचे जात आहे आणि यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. करारनाम्याची ऐशितेशी करणाऱ्या व शासकिय नियम धाब्याबर बसवणाऱ्या सदर कंत्राटदाराला याच विभागातील अधिकारी सहकार्य करीत असल्याने व दोघांच्या संगनमताने लाखोची हेराफेरी झाल्याने शासनाचे व शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सदर कंत्राटदारावर त्वरीत कारवाई करून त्याचे कंत्राट काळ्या यादीत नाव टाकण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 
News - Chandrapur | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-