Today : 14:08:2020


राणी दुर्गावती विद्यालयात स्वयंस्फुर्त भाषण स्पर्धेचे आयाेजन

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर           
आलापल्ली, फराज शेख :-
  आल्लापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वयंस्फुर्त भाषण स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन लाेनबले तर प्रमुख अतिथी म्हणून पुंडलिक कविराज हे हाेते. तसेच सुरूवातीला सत्येंदर सिलमवार यांनी या स्पर्धेचे नियम समजावून सांगितले. तर ईश्वर चिठ्टीद्वारे वेळेवर मिळणाऱ्या विषयावर विद्यार्थ्यांना आपले मत मांडायचे हाेते. अशाप्रकारे पंचेविस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पंचेविस विषयावर आपापली मते मांडलीत. आपल्या भावी जीवनात अचानक स्टेजवर भाषणाला जायचे असेल तरी विद्यार्थी प्रभावीपणे आपले मत मांडू शकताे हे यावरून दिसून आले.     
     सावित्रीबाई फुले नसत्या तर, मी राष्ट्रपती झालाे तर, असे आणि दैनंदिन जीवनातील अनेक विषयावर विद्यार्थी परखडपणे आपली मते मांडत हाेते. इतरही विद्यार्थी स्पर्धकांचे मनाेगत वाढविण्यासाठी  उत्स्फुर्त टाळ्या वाजवून दाद देत हाेते. या स्पर्धेत रंगतदार उदाहरणांमधून सर्वांचा उत्साह वाढत हाेता.      कार्यक्रम अध्यक्श गजानन लाेनबले यांनी या प्रसंगी मानवी जीवन आणि निर्णयक्षमता या विषयी उद्बाेधन केले. पुंडलिक कविराजांच्या यांनी व्यक्ती हा काेणतिही आव्हाने पेलण्यासाठी सदैव तयार असायला पाहिजे असे प्रतिपादन केले. परीक्षक म्हणून गणेश पहापळे, श्रिनिवास कारेंगुलवार आणि राजगाेपाल मेनेनी यांनी काम पाहिले. संचलन पेशवा गाेवंशी आणि हनमंतु आगे यांनी केले. स्पर्धेनंतर विजेत्या स्पर्धकांचे प्रचंड टाळ्यांनी अभिवादन केले आणि बक्षिस देवून गाैरविण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेश्वर गाेबाडे यांनी सर्व स्पर्धकांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संचालन राेशनी गाेवंशी यांनी तर आभार प्रदर्शन आरती गेडाम  यांनी केले. यशस्वितेसाठी स्वरूप गावडे, साेहेल शेख, संदिप मुडावार, राजेश वेळदा, सचिन मावलीकर, मालती आलाम, अशाेक शेंडे, शांता मांडाेरे, विनोद सल्लम, शंकर चालुरकर, सिनू ताेटा यांचे सहकार्य लाभले.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
 नवरगाव पासून एक किलोमिटर अंतरावरील धुमनख