Today : 08:08:2020


भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि युवक काँग्रेस तर्फे धाब्यात कडकडीत बंद

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर           
धाबा, प्रतिनिधी :-
अखिल भारतीय बौद्ध महासभा व युवक काँग्रेसच्या वतीने भिमा कोरेगाव येथील द्विशताब्दी शौर्यदिन कार्यक्रमात सहभागी समाज बांधवावर झालेल्या दगडफेकीचा तीव्र निषेध करण्यासाठी गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात शांततामय मार्गाने कडकडीत बंद पुकारण्यात आला. या प्रसंगी धाबा येथे पाडण्यात आलेल्या बंदला मा.नामदेव सांगडे यांच्या नेतृत्वात कुणबी समाज संघटनेने जाहीर पांठीबा दिला होता. तर व्यावसायिक संघटनेने  बंदला पुर्ण सहकार्य केले. सर्वप्रथम डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून आणि आज ज्यांची जयंती होती अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन निषेध मोर्चा काढण्यात आला.
     या प्रसंगी बंद मध्ये सहभागी अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि युवक काँग्रेस तर्फे धाब्याचे ठाणेदार लाकडे यांना भिमा कोरेगाव घटनेचा निषेध नोंदविणारे आणि या भ्याड हल्ल्यात सहभागी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यात बौद्ध महासभेच्या वतीने अध्यक्ष ईश्वर झाडे, प्रविण मेश्राम, सिध्दार्थ भगत, संतोष झाडे, विजय देवतळे, निलेश झाडे, चेतन झाडे, अरुण बोरकर, देविदास चापले, तेजरुप डोंगरे, उमेश झाडे आदी नागरिक उपस्थीत होते. 
     तर युवक काँग्रेसच्या वतीने संतोष बंडावार, अक्षय झाडे, संतोष मुप्पीडवार, रामकृष्ण सांगडे, नाना येलमुले, मंगेश चापले, आकाश झाडे, सुरज भस्की, सुदर्शन दयालवार, अभिजीत भगत, निखिल गंप्पलवार, सौरभ झाडे, अजित चापले, आषिश मुंजनकर, आदिंची उपस्थिती होती. याशिवाय बंद यशस्वी करण्यासाठी मोठय़ा संख्येने गावातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
News - Chandrapur | Posted : 2018-01-04


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli